प्रकटी 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा ‘रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर’ वृष्टी झाली; आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला; एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पहिल्या देवदूताने कर्णा वाजवताच रक्तमिश्रित गारा व अग्नी ही आली. ती पृथ्वीवर टाकण्यात आली यासाठी की, पृथ्वीचा तिसरा भाग व झाडांचा तिसरा भाग जळून गेला; आणि सर्व हिरवे गवत जळून गेले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली आणि एक तृतीयांश पृथ्वी जळून गेली. एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पहिल्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा पृथ्वीवर रक्तमिश्रित गारा व अग्नीचा वर्षाव झाला. पृथ्वीच्या एकतृतीयांश भागाला आग लागली आणि त्यामुळे एकतृतीयांश वृक्ष व सर्व हिरवे गवत जळून गेले. Faic an caibideil |