प्रकटी 8:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला; त्याला मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले : “जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्यांच्या होणार्या ध्वनीने पृथ्वीवर राहणार्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि मी पाहिले, तेव्हा एक गरूड आकाशाच्या मध्यभागी उडत होता; आणि मी त्यास मोठ्याने असे म्हणताना ऐकले की, जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्या आवाजाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार! Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 मी पाहिले तेव्हा एक गरूड अंतराळात उंच उडताना दृष्टीस पडला. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, “इतर तीन देवदूत कर्णा वाजविणार आहेत, तेव्हा त्यांच्या कर्ण्यांच्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर किती अनर्थ, अनर्थ, अनर्थ ओढवणार आहे!” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मी हे पाहत असतानाच, आकाशातून एक गरुड पक्षी उडतांना मला दिसला. तो मोठ्याने म्हणत होता, “धिक्कार! धिक्कार! पृथ्वीवरील लोकांना धिक्कार! कारण लवकरच उरलेले तीन देवदूत आपआपले कर्णे वाजवितील.” Faic an caibideil |