Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 8:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्या तार्‍याचे नाव कडूदवणा; आणि पाण्याच्या एक तृतीयांशाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने माणसांपैकी पुष्कळ माणसे मेली; कारण ते कडू झाले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ माणसे मरण पावली; कारण ते पाणी कडू झाले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 (त्या ताऱ्याचे नाव “कडुदवणा”) आणि पाण्याचा एक तृतीयांश भाग कडुदवणा झाला, त्या पाण्याने पुष्कळ माणसे मेली कारण ते पाणी कडू झाले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्या तार्‍याचे नाव कडूदवणा असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील एकतृतीयांश पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 8:11
17 Iomraidhean Croise  

मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले; तेथील पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा1 असे पडले.


तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते.


ह्याकरता सेनाधीश परमेश्वर संदेष्ट्याविषयी म्हणतो, “पाहा, मी त्यांना खायला कडूदवणा व प्यायला विष देईन, कारण यरुशलेमेच्या संदेष्ट्यांपासून अधर्म निघून देशभर पसरला आहे.”


ह्यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांना कडू दवणा चारीन, त्यांना विषाचे पाणी पाजीन,


माझी विपत्ती व माझे भ्रमण, कडू दवणा व विष ह्यांचे स्मरण कर.


त्याने विष व दु:ख ह्यांचा कोट माझ्याभोवती रचला आहे.


न्यायाचा कडूदवणा करणारे व नीतिमत्ता धुळीस मिळवणारे लोकहो,


घोडे खडकावर धावतात काय? कोणी तेथे बैल नेऊन नांगरतात काय? तुम्ही तर न्यायाऐवजी विष व नीतिमत्तेच्या फळाऐवजी कडूदवणा केला आहे.


परमेश्वर म्हणतो, “देशभर असे होईल की, त्याचे दोन भाग नष्ट करतील, पण त्याचा तिसरा भाग मागे राहील.


तो तिसरा भाग मी अग्नीत टाकीन, रुपे गाळतात तसे मी त्यांना गाळीन, सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यांना शुद्ध करीन; ते माझे नाम घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन; मी म्हणेन, ‘हे माझे लोक’ व ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव.”’


आज आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून परावृत्त होऊन त्या राष्ट्रांच्या देवांची सेवा करायला आपले मन प्रवृत्त करील असा एखादा पुरुष, स्त्री, कूळ किंवा वंश तुमच्या लोकांत कदाचित असायचा! कोण जाणे! विष व कडूदवणा येणारे मूळ तुमच्यामध्ये असेल!


देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही “कडूपणाचे मूळ” अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी ‘आपले ज्येष्ठपण विकले’ त्या ‘एसावासारखे’ कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून ह्याकडे लक्ष द्या.


त्याच्या शेपटाने ‘आकाशातील तार्‍यांपैकी एक तृतीयांश तारे’ ओढून काढून ते ‘पृथ्वीवर पाडले’; ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणार्‍या स्त्रीपुढे उभा राहिला होता.


पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा ‘रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर’ वृष्टी झाली; आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला; एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले.


तेव्हा माणसांपैकी एक तृतीयांश माणसे जिवे मारण्याकरता नेमलेली घटिका, दिवस, महिना व वर्ष ह्यांसाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे झाले.


त्यांच्या तोंडांतून निघणार्‍या अग्नी, धूर व गंधक ह्या तीन पीडांमुळे एक तृतीयांश माणसे जिवे मारली गेली.


ती त्यांना म्हणाली, “मला नामी (मनोरमा) म्हणू नका तर मारा (क्लेशमया) म्हणा; कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan