Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशातील एकशे चव्वेचाळीस हजांरावर शिक्का मारण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्त्राएली लोकांच्या बारा वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ज्या लोकांवर हा शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली: ते इस्राएलच्या सर्व बारा वंशांमधून 1,44,000 लोक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 7:4
17 Iomraidhean Croise  

मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, “आकाशाकडे दृष्टी लाव; तुला हे तारे मोजवतील तर मोज.” मग त्याने त्याला सांगितले, “तुझी संतती अशीच होईल.”


इस्राएलाच्या मुलांच्या नावांच्या संख्येएवढी ही रत्ने असावीत, त्यांच्या संख्येइतकी बारा नावे असावीत, मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे.


प्रभू परमेश्वर म्हणतो : “तुम्ही हा देश इस्राएलाच्या बारा वंशांना वतन म्हणून वाटून द्याल तेव्हा त्यात योसेफाचे दोन वाटे धरून त्याच्या सीमा येणेप्रमाणे असाव्यात.


इस्राएलच्या सर्व वंशांतील कामधंदा करणार्‍या नगरातल्या लोकांनी त्या भागाची मशागत करावी.


नगराच्या वेशी इस्राएल वंशांच्या नावांप्रमाणे असाव्यात : उत्तरेकडे तीन वेशी असाव्यात - रऊबेन वेस, यहूदा वेस व लेवी वेस.


हद्राख देशाविषयी परमेश्वराची वाणी : ती दिमिष्कास पोचवून तेथे स्थिर होईल; कारण परमेश्वराची नजर मनुष्यजातीकडे व इस्राएलाच्या सर्व वंशांकडे आहे;


येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल.


दास म्हणाला, ‘महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे.’


ह्यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करावा.”


ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करत आहेत. महाराज, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहूद्यांनी आरोप ठेवला आहे.


यशयाही इस्राएलाविषयी असे पुकारतो की, “जरी इस्राएल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी अवशेष मात्र तारण पावेल;


बारा वंशांतील पांगलेल्या लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याचा सलाम.


नंतर मी पाहिले, तो पाहा, कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव ‘कपाळावर’ लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते;


ते राजासनासमोर आणि चार प्राणी व वडील ह्यांच्यासमोर जसे काय ‘एक नवे गीत गात होते;’ ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक ह्यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते.


यहूदा वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला; रऊबेन वंशापैकी बारा हजारांवर; गाद वंशापैकी बारा हजारांवर;


आणि घोडदळांची संख्या वीस कोटी होती; ही त्यांची संख्या मी ऐकली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan