Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 7:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ते ह्यापुढे ‘भुकेले असे होणार नाहीत, व तान्हेलेही होणार नाहीत; त्यांना सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 ते आणखी भुकेले आणि आणखी तान्हेले होणार नाहीत, त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 ते ह्यापुढे भुकेले व तान्हेलेही होणार नाहीत. त्यांना सूर्य किंवा कोणतीही भस्मसात करणारी उष्णता बाधणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्यांना पुन्हा कधी भूक, किंवा तहान लागणार नाही; त्यांना सूर्याचा ताप, किंवा दाहक उष्णता बाधणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 7:16
23 Iomraidhean Croise  

परमेश्वर तुझा रक्षक आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे.


दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही.


मी आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे. (सेला)


माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन?


हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.


मी काळीसावळी आहे हे मनात आणू नका, कारण मी उन्हाने होरपळले आहे. माझे सहोदर बंधू माझ्यावर संतप्त झाले; त्यांनी मला द्राक्षीच्या मळ्यांची राखण करण्यासाठी ठेवले; पण माझ्या स्वत:च्या मळ्याची राखण मी केली नाही.


कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणार्‍या वादळाप्रमाणे आहे; पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली, असा झालास.


वार्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल.


दीन व दरिद्री पाणी शोधतात पण ते कोठेच नाही; त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; त्यांची विनंती मी परमेश्वर ऐकेन, मी इस्राएलाच्या देव त्यांचा त्याग करणार नाही.


त्यांना तहानभूक लागणार नाही; झळई व ऊन ह्यांची बाधा त्यांना होणार नाही; कारण त्यांच्यावर दया करणारा त्यांचा नेता होईल; पाण्याच्या झर्‍यांवर तो त्यांना नेईल.


ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल; माझे सेवक पितील, पण तुम्ही तान्हेले राहाल; पाहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजीत व्हाल;


मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळईचा वारा वाहवला, तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले; त्याने तो मूर्च्छित झाला व आपणाला मृत्यू येवो, अशी विनवणी करून तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते!”


परंतु त्याला मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो, आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लगेच अडखळतो.


आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले.


जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.


तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात.


आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले; व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले.


‘त्याने भुकेलेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे,’ व ‘धनवानांस रिकामे लावून दिले आहे.’


अहो, जे तुम्ही आता भुकेले आहात ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो, जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही हसाल.


परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”


सूर्य तीव्र तेजाने उगवला व त्याने ‘गवत कोमेजवले, मग त्याचे फूल गळाले,’ आणि त्याच्या रूपाची शोभा गेली; ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल.


‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan