Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 7:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 “आमेन; धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ हे युगानुयुग आमच्या देवाचे आहेत! आमेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 म्हणाले, आमेन; स्तुती, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत; आमेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 “आमेन! धन्यवाद, गौरव, सुज्ञता, आभारप्रदर्शन, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुगे आमच्या देवाची आहेत, आमेन!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 ते म्हणाले: “आमेन! आमच्या परमेश्वराला धन्यवाद, गौरव, सुज्ञता, उपकारस्तुती, मान, सामर्थ्य आणि पराक्रम सदासर्वकाळ असो. आमेन!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 7:12
27 Iomraidhean Croise  

प्राचीन काळी म्हणजे दावीद व आसाफ ह्यांच्या दिवसांत एक मुख्य गायक व देवाची स्तुतिस्तोत्रे ह्यांची योजना केली होती.


लेवी : येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, मत्तन्या व त्याचे भाऊबंद स्तुतिगायनाच्या कामावर होते;


त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा; त्याचे उपकारस्मरण करा; त्याच्या नावाचा धन्यवाद करा.


इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादि कालापासून अनंतकालपर्यंत धन्यवाद होवो. सर्व लोक “आमेन” म्हणोत. परमेशाचे स्तवन करा!1


ते त्याला उपकारस्मरणरूपी यज्ञ अर्पोत, व स्तोत्रे गाऊन त्याची कृत्ये वर्णोत.


मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन, परमेश्वराच्या नावाचा धावा करीन.


तुम्ही परमेश्वराचे उपकारस्मरण करून त्याची कीर्ती वर्णा; वीणेवर आमच्या देवाची स्तोत्रे गा.


इस्राएलाचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन, आमेन.


देवाला आभाररूपी यज्ञ कर; परात्परापुढे आपले नवस फेड;


त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो; त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन! आमेन!


परमेश्वर सदासर्वकाळ धन्यवादित असो. आमेन, आमेन.


उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.


पाहा, परमेश्वराने सीयोनेचे सांत्वन केले; तिच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे; तिचे रान एदेनासारखे केले, तिचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला; आनंद व उल्लास, उपकारस्मरण, गायनवादनाचा ध्वनी तिच्यामध्ये होत आहे.


त्यांत आनंद व हर्ष ह्यांचा ध्वनी होईल, नवर्‍याची व नवरीची वाणी ऐकू येईल; ‘सेनाधीश परमेश्वराची स्तुती असो, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सर्वकाळची आहे,’ असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतात त्यांचा शब्द पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास उलटवून आरंभी होते तसे सर्वकाही करीन, असे परमेश्वर म्हणतो.


आणि ह्या नगराचे नाव पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांसमोर माझ्या आनंदास, स्तुतीस व सन्मानास कारण होईल; त्यांचे मी जे कल्याण करीन त्याविषयी ती ऐकतील; आणि मी त्यांना हित व शांती प्राप्त करून देईन; ह्या सर्वांमुळे ती राष्ट्रे भयभीत होतील व थरथर कापतील.


पण मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्वरापासून होते.”


आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’]


कारण सर्वकाही त्याच्याचपासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.


तू केवळ आत्म्याने धन्यवाद केलास, तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकारस्तुतीला “आमेन” कसे म्हणेल? कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही.


सर्वकाही तुमच्याकरता आहे, ह्यासाठी की, पुष्कळ जणांच्या द्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभारप्रदर्शनाला साधनीभूत व्हावी.


त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हांला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले, आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा.


आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.


अशा आपल्या उद्धारक एकाच ज्ञानी देवाला, (येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे) गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग आहेत. आमेन.


मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


तेव्हा ते चोवीस वडील व ते चार प्राणी उपडे पडून ‘राजासनावर बसलेल्या’ देवाला नमन करताना म्हणाले, “आमेन; हालेलूया!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan