Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 6:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 कारण त्याच्या ‘क्रोधाचा मोठा दिवस’ आला आहे, ‘आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, आणि त्याच्यापुढे कोण टिकेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 कारण त्यांच्या क्रोधाचा भयंकर दिवस आला आहे, त्याच्यापुढे कोणाच्याने टिकाव धरवेल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 कारण त्यांच्या क्रोधाचा महान दिवस आला आहे, त्यात कोणाचा निभाव लागेल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 6:17
20 Iomraidhean Croise  

तुझ्या उजव्या हाताकडे असलेला प्रभू आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा बिमोड करील;


पुत्राने2 रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.


तुझे, केवळ तुझेच, भय धरले पाहिजे; तुला एकदा क्रोध आला म्हणजे तुझ्यापुढे कोण उभा राहील?


कारण सूड घेण्याचा दिवस मी आपल्या मनात योजला होता, माझ्या उद्धारकार्याचे वर्ष आले आहे.


हायहाय! तो महादिन आहे; त्याच्यासमान दुसरा कोणता नाही; तो याकोबाचा क्लेशसमय आहे तरी त्यातून त्याचा निभाव होईल.


त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.


सीयोनात कर्णा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा; देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण, परमेश्वराचा दिवस येत आहे, तो येऊन ठेपला आहे.


परमेश्वर आपल्या सैन्यापुढे गर्जना करतो; कारण त्याचा तळ विस्तीर्ण आहे; त्याचा हुकूम बजावणारा बलवान आहे; परमेश्वराचा दिवस मोठा व फार भयंकर आहे; त्या वेळी कोण टिकेल?


परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.


त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.


त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण तो धातू गाळणार्‍याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे;


तुम्ही तर होणार्‍या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.”


की, आपल्या हटवादीपणाने पश्‍चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?


आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरता राखून ठेवले.


‘राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली,’ तुझ्या ‘क्रोधाची’ वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि ‘तुझे दास संदेष्टे’ व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासाडी करणार्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”


ते चिन्हे दाखवणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात.


बेथ-शेमेशकर म्हणू लागले, “ह्या परमेश्वरासमोर, ह्या पवित्र देवासमोर कोण टिकेल? तो आता आमच्याकडून निघून कोणीकडे जावा?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan