Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 6:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ‘पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी’, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, ‘गुहांत’ व डोंगरांतील ‘खडकांतून लपली;’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व स्वतंत्र माणसे, गुहात व डोगरांतील खडकातून लपली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 तेव्हा पृथ्वीवरील राजे, राज्यकर्ते व सैन्याधिकारी, श्रीमंत व प्रभावशाली लोक, इतर सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, गुहांत व डोंगरांतील खडकांखाली लपली

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तेव्हा पृथ्वीवरील राजे, राजपुत्र, सैन्याचे उच्चाधिकारी, श्रीमंत तसेच बलवान लोक, सर्व लहान थोर माणसे, गुलाम आणि स्वतंत्र लोक, सर्वजण डोंगराच्या गुहांमध्ये व खडकांमध्ये दडून बसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 6:15
19 Iomraidhean Croise  

ह्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यांना ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली.


अधिपतींची हिंमत तो नष्ट करतो; पृथ्वीवरील राजांना तो भयप्रद आहे.


परमेश्वराच्या भयप्रद दृष्टीपुढून, त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापांपुढून खडकात दडून जा; आपणाला धुळीत पुरून घे.


परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून लोक खडकांतल्या गुहांत व भूमीच्या विवरांत शिरतील.


परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून ते खडकांतल्या गुहांत व दगडांतल्या कपारींत शिरतील.


तरी हे लुटलेले, नागवलेले लोक आहेत; ते सर्व गर्तांच्या पाशात सापडले आहेत, कारागृहात कोंडले आहेत; ते भक्ष्य झाले आहेत, त्यांना सोडवणारा कोणी नाही; ते लूट झाले आहेत, आणि “ती परत द्या” असे म्हणणारा कोणी नाही.


ती सर्पाप्रमाणे धूळ चाटतील, पृथ्वीवरील सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे ती आपल्या विवरांतून थरथर कापत बाहेर येतील, परमेश्वर आमचा देव ह्याच्याकडे ती भयकंपित होऊन येतील; ती तुझ्यापुढे भयभीत होतील.


त्यांना जग योग्य नव्हते; ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत.


‘दिव्याचा उजेड’ तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही; ‘आणि नवरानवरीचा शब्द’ तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणारच नाही; तुझे ‘व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक’ होते; आणि सर्व राष्ट्रे ‘तुझ्या चेटकाने’ ठकवली गेली.


मिद्यानाचा हात इस्राएलावर प्रबळ झाला; मिद्यानाच्या भीतीने इस्राएल लोकांनी डोंगराडोंगरातून आपल्यासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले.


आपण पेचात सापडलो आहोत असे इस्राएल लोकांनी पाहिले, (खरोखरच त्या लोकांना संकट प्राप्त झाले होते,) तेव्हा ते गुहा, झुडपे, खडक, दुर्ग व विवरे ह्यांत लपले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan