Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 6:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ‘एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश’ गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणांवरून ढळली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 एखाद्या गुंडाळीसारखे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपआपल्या ठिकाणांवरून ढळून गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 एखादी गुंडाळी गुंडाळावी तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि प्रत्येक डोंगर व बेट आपापल्या ठिकाणांवरून ढळले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 एखाद्या गुंडाळीप्रमाणे अंतराळ गुंडाळले गेले आणि प्रत्येक पर्वत व बेट हादरून आपल्या जागेवरून ढळले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 6:14
16 Iomraidhean Croise  

ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील; ती तू प्रावरणासारखी बदलशील आणि ती नाहीशी होतील.


आकाशातील सर्व सेना गळून पडेल, आकाश गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल; द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, अंजिराचा सुकलेला पाला गळतो, त्याप्रमाणे ती सेना समूळ गळून पडेल.


कारण पर्वत दृष्टिआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही; माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो.


टेकड्यांवरील शब्द, डोंगरांवरील गडबड खोटी ठरली आहे; खरोखर आमचा देव परमेश्वर ह्याच्या ठायी इस्राएलाचे तारण आहे.


हे सर्व पृथ्वीचा नाश करणार्‍या विध्वंसगिरी, पाहा, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्याविरुद्ध आहे; मी आपला हात तुझ्यावर उगारीन, तुझा कडेलोट करीन, जळून कोळ झालेल्या पर्वतासमान मी तुला करीन.


समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, वनातले पशू, जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी व भूमीवर राहणारी सर्व माणसे माझ्यापुढे थरथर कापतील; पर्वत नष्ट होतील, कडे खचतील, हरएक कोट कोसळून जमीनदोस्त होईल.


त्याच्यापुढे पर्वत कंपायमान होतात व डोंगर विरघळतात; त्याच्यापुढे ही पृथ्वी, हा भूगोल व त्यांवरील सर्व रहिवासी थडथड उडतात.


पर्वत तुला पाहून विव्हळतात; जलप्रवाह सपाट्याने चालला आहे, डोह आपला शब्द उच्चारतो, आपले हात वर करतो.


तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते; तो नजर टाकून राष्ट्रांना उधळून लावतो. सर्वकाळचे पर्वत विदीर्ण होतात, युगानुयुगीचे डोंगर ढासळतात, त्याचा हा पूर्वकाळापासून प्रघात आहे.


तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.1


प्रत्येक बेट पळून गेले आणि डोंगरांचा ठावठिकाणाही राहिला नाही.


‘नंतर’ मोठे पांढरे ‘राजासन’ व त्यावर ‘बसलेला’ एक जण ‘माझ्या दृष्टीस पडला;’ त्याच्या ‘तोंडापुढून पृथ्वी’ व आकाश हे ‘पळाले; त्यांकरता ठिकाण उरले नाही.’


नंतर मी ‘नवे आकाश व नवी पृथ्वी’ ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan