Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 6:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला; ‘सूर्य’ केसांपासून बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा ‘चंद्र रक्ता’सारखा झाला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला, सूर्य केसांच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला; व सगळा चंद्र रक्तासारखा झाला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 कोकराने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले. तेव्हा भीषण स्वरूपाचा भूकंप झाला. सूर्य केसांच्या गोणपाटासारखा काळा झाला व पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मी पाहत असताना त्याने सहावा शिक्का फोडला, तेव्हा एक प्रचंड भूमिकंप झाला. सूर्य शेळ्याच्या केसांपासून तयार केलेल्या गोणपाटासारखा काळा झाला; चंद्र रक्तासारखा लाल झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 6:12
31 Iomraidhean Croise  

चंद्र तांबूस होईल, सूर्य फिक्का पडेल; कारण सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत आपल्या प्रजेतील वडिलांसमोर वैभवाने राज्य करील.


मेघगर्जना, भूमिकंप, महानाद, वावटळ, तुफान व ग्रासणारी अग्निज्वाला ह्यांनी सेनाधीश परमेश्वर तुझा समाचार घेईल.


आकाशातील सर्व सेना गळून पडेल, आकाश गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल; द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, अंजिराचा सुकलेला पाला गळतो, त्याप्रमाणे ती सेना समूळ गळून पडेल.


मी आकाशास काळा पेहराव लेववतो; गोणपाट त्याचे पांघरूण करतो.”


त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते. सूर्य व चंद्र काळे पडतात आणि तारे प्रकाशण्याचे थांबतात.


सूर्य व चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशण्याचे थांबतात.


तकोवा येथील मेंढपाळांतला आमोस ह्याला, यहूदाचा राजा उज्जीया व इस्राएलाचा राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या काळात, भूमिकंपापूर्वी दोन वर्षे, इस्राएलाविषयी दृष्टान्तरूपाने प्राप्त झालेली वचने ही :


प्रभू परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी असे होईल की मी सूर्याचा दुपारी अस्त करीन, निरभ्र दिवशी पृथ्वीवर अंधार करीन.


तुम्ही माझ्या डोंगराच्या खोर्‍याकडे धावाल, कारण डोंगरांचे खोरे आसलापर्यंत जाऊन भिडेल; व यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूमिकंपापासून जसे तुम्ही पळाला तसे पळाल; परमेश्वर माझा देव येईल, तुझ्यासमागमे तुझे सर्व भक्त येतील.


“हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्‍चात्ताप केला असता.


त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’


कारण ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल’ आणि जागोजागी दुष्काळ, मर्‍या व भूमिकंप होतील;


मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.


शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले.


तेव्हा पाहा, मोठा भूमिकंप झाला; कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला, त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तिच्यावर तो बसला.


सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.


त्याच घटकेस ‘मोठा भूमिकंप’ झाला. तेव्हा त्या नगराचा दहावा भाग ‘पडला,’ भूमिकंपाने सात हजार माणसे ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी ‘स्वर्गीय देवाचा’ गौरव केला.


तेव्हा ‘विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट’ झाले. शिवाय इतका मोठा भूमिकंप झाला की ‘पृथ्वीवर’ मानव ‘झाल्यापासून’ इतका मोठा भूमिकंप ‘कधी झाला नव्हता.’


चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली; आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली.


चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व तार्‍यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले.


तेव्हा देवदूताने ‘धुपाटणे’ घेऊन त्यात ‘वेदीवरचा अग्नी भरून’ पृथ्वीवर टाकला आणि ‘मेघांचा गडगडाट व गर्जना’ झाल्या, ‘विजा’ चमकल्या व भूमिकंप झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan