Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्या चारही प्राण्यांना ‘प्रत्येकी सहा-सहा पंख असून ते प्राणी’ आतून ‘बाहेरून सर्वांगी, डोळ्यांनी भरलेले’ होते; आणि, “पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, ‘जो आहे’ व जो येणार तो ‘सर्वसमर्थ प्रभू देव,”’ असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते व त्यांना सगळीकडे डोळे होते, त्यांच्या पंखावर आणि आतून डोळे होते, दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते. “‘पवित्र, पवित्र, पवित्र, हा प्रभू देव सर्वसमर्थ,’ जो होता, जो आहे आणि जो येणार आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी सहा पंख होते व ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. “सर्वसमर्थ प्रभू देव पवित्र, पवित्र, पवित्र आहे. तो होता, तो आहे व तो येणार आहे”, असे ते रात्रंदिवस गातात; ते कधीच थांबत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्या चारही सजीव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे बोलत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र, ते सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहेत! जे होते, जे आहेत आणि जे येणार आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 4:8
42 Iomraidhean Croise  

अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा.


जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.


हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?


देव मोशेला म्हणाला, “मी आहे तो आहे; तू इस्राएलवंशजांस सांग, ‘मी आहे’ ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे.”


आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आला आहे; सर्वसमर्थाकडून हा एक विनाशच येत आहे.


सीयोनेची नीतिमत्ता उदयप्रभेप्रमाणे फाकेपर्यंत तिच्याकरिता मी मौन धरणार नाही, यरुशलेमेचे तारण पेटलेल्या मशालींप्रमाणे दिसेपर्यंत तिच्याकरिता मला चैन पडणार नाही.


चाकाच्या धावा पाहिल्या तर त्या फार उंच व भयानक होत्या; त्या चोहोंच्या धावांसभोवती सर्वत्र डोळे होते.


त्याच्या मध्यभागी चार जिवंत प्राण्यांच्या आकृतींसारखे काही बाहेर पडले; दिसण्यात ते मनुष्याकृती होते.


त्या प्रत्येकाला चार मुखे होती, व प्रत्येकाला चार पंख होते.


त्यांचे सर्व शरीर, पाठ, हात, पंख व चार चाके ह्यांना सर्वत्र डोळे होते.


त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.


म्हणून मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही ही आठवण ठेवून सावध राहा.


आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’ तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या असे व्हाल, ‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.”


बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे; तुमच्यातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रं-दिवस कामधंदा करून तुमच्यापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.


आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वत:चे व तुझे ऐकणार्‍यांचेही तारण साधशील.


वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर.


येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे.


आशियातील सात मंडळ्यांना योहानाकडून : जो आहे, जो होता व जो येणार त्याच्यापासून, त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्यापासून,


‘प्रभू देव जो आहे,’ जो होता व जो येणार, ‘जो सर्वसमर्थ,’ तो म्हणतो, “मी अल्फा व ओमेगा आहे.”2


“हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था; जो तू आहेस व होतास [व येणार], तो तू, आपले महान सामर्थ्य धारण केले आहेस आणि ‘राज्यारूढ झाला आहेस’ म्हणून आम्ही तुझे आभार मानतो.


त्यांच्या पीडेचा ‘धूर युगानुयुग वर येतो;’ आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यांना, आणि जो कोणी त्याच्या नावाची खूण धारण करून घेतो त्याला ‘रात्रंदिवस’ विश्रांती मिळत नाही.”


ते राजासनासमोर आणि चार प्राणी व वडील ह्यांच्यासमोर जसे काय ‘एक नवे गीत गात होते;’ ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक ह्यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते.


‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्‍याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’


त्या चार प्राण्यांपैकी एकाने युगानुयुग जिवंत असणार्‍या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या सात वाट्या त्या सात देवदूतांना दिल्या.


ते चिन्हे दाखवणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात.


नंतर मी वेदीला1 असे बोलताना ऐकले, “हो, ‘हे प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझे न्याय सत्य’ व ‘नीतीचे’ आहेत!”


त्याने ‘राष्ट्रांना मारावे’ म्हणून त्याच्या ‘तोंडातून तीक्ष्ण धारेची’ तलवार निघते; तो ‘त्यांच्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील’; आणि सर्वसमर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे ‘कुंड तो तुडवतो.’


तेव्हा ते चोवीस वडील व ते चार प्राणी उपडे पडून ‘राजासनावर बसलेल्या’ देवाला नमन करताना म्हणाले, “आमेन; हालेलूया!”


त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर होते.


फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ ‘दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही,’ तो असे म्हणतो :


राजासनाभोवती चोवीस आसने होती; आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यांवर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडील बसलेले होते.


राजासनापुढे ‘स्फटिकासारखा’ जणू काय काचेचा समुद्र होता; ‘आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या चार बाजूंना’ पुढे व मागे ‘अंगभर डोळे असलेले चार प्राणी’ होते.


‘राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे’ त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करतात,


तेव्हा राजासन व चार प्राणी ह्यांच्यामध्ये व वडीलमंडळ ह्यांच्यामध्ये, ज्याचा जणू काय ‘वध करण्यात’ आला होता, असा ‘कोकरा’ उभा राहिलेला मी पाहिला; त्याला सात शिंगे व ‘सात डोळे होते;’ ते ‘सर्व पृथ्वीवर’ पाठवलेले देवाचे सात आत्मे आहेत.


मग कोकर्‍याने त्या सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले, तेव्हा चार प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या ध्वनीने, “ये,”2 असे म्हणाला, ते मी ऐकले.


आणि जणू काय चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी : “रुपयाला शेरभर गहू, आणि रुपयाला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस ह्यांची हानी करू नकोस!”


तेव्हा राजासन, वडीलमंडळ व चार प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते, ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले :


ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि ‘राजासनावर बसलेला’ त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan