Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस; कारण तू सर्वकाही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 “हे प्रभू, आमच्या देवा, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस, तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास, कारण तू सर्वकाही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 “प्रभो, आमच्या देवा ! गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू पात्र आहेस कारण तू सर्वांना निर्माण केले व तुझ्या इच्छेने त्यांना अस्तित्व आणि जीवन मिळाले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “हे आमच्या प्रभू आणि परमेश्वरा, गौरव, आदर, सामर्थ्य स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात; कारण तुम्ही सर्व निर्माण केले. तुमच्याच इच्छेने सर्वकाही अस्तित्वात आले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 4:11
31 Iomraidhean Croise  

प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.


स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.


मग येशूवा, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या व पथह्या हे लेवी म्हणाले, “उभे राहा आणि आपला देव परमेश्वर ह्याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंतकाळ करा : तुझे वैभवशाली नाम धन्य असो; ते सर्व धन्यवाद व स्तवन ह्यांपलीकडे आहे.


मी दुरून आपले ज्ञान आणून आपल्या उत्पन्नकर्त्याचे न्याय्यत्व स्थापित करीन.


स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.


देवाच्या बलाचे वर्णन करा; इस्राएलावर त्याचे ऐश्वर्य आणि गगनमंडळात त्याचे बळ आहे.


कारण सहा दिवसांत परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला; म्हणून परमेश्वराने शब्बाथ दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला.


परमेश्वराने सर्वकाही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे.


आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो; तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.


तुला कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धी अगम्य आहे.


तुम्ही त्यांना हे सांगा की, “ज्या देवांनी आकाश व पृथ्वी केली नाही ते पृथ्वीवरून, आकाशाखालून नष्ट होतील.”


‘अहा प्रभू परमेश्वरा! पाहा, तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली; तुला अवघड असे काही नाही.


“गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत; तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील अवघे निर्माण केले’ त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो.


ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही;


कारण सर्वकाही त्याच्याचपासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.


आणि ज्याने [येशू ख्रिस्ताद्वारे] सर्वकाही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे;


तो दुर्ग आहे; त्याची कृती परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे, त्याच्या ठायी अनीती नाही; तो न्यायी व सरळ आहे.


आणि, “हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्ये आहेत;


तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्या द्वारे त्याने विश्व निर्माण केले.


आणि आपल्याला ‘राज्य’ आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी ‘याजक’ असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन.


आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले’, आणखी अवकाश लागणार नाही;


तो मोठ्याने म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे. ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र’ व पाण्याचे झरे ‘निर्माण केले,’ त्याला नमन करा.”


ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘हालेलूया!’ तारण, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही प्रभू जो आमचा देव ह्याची आहेत;


ते मोठ्याने म्हणत होते : “वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान गौरव व धन्यवाद हे घेण्यास योग्य आहे!”


आणि “गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?” असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला.


ते ‘नवे गीत गाऊन’ म्हणतात : “तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस; कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून 1आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत


Lean sinn:

Sanasan


Sanasan