प्रकटी 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पाहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणांला यहूदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात; त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते ‘येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील’ व ‘मी तुझ्यावर प्रीती केली आहे’ हे त्यांना कळून येईल, असे मी करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पाहा, जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती केली आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 ऐक! जे सैतानाच्या समुदायात असून आपणाला यहुदी म्हणवितात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते तुझ्या पायांजवळ येऊन तुझी आराधना करतील व मी तुझ्यावर प्रीती केली आहे, हे त्यांना कळून चुकेल, असे मी करीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जे सैतानाच्या सभास्थानातील असून स्वतःला यहूदी म्हणतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांना मी तुमच्या स्वाधीन करेन. पाहा, ते तुमच्या पाया पडतील व मी तुमच्यावर प्रीती केली आहे हे ते स्वीकारतील. Faic an caibideil |