Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ ‘दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही,’ तो असे म्हणतो :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिहीः जो पवित्र व सत्य आहे त्याचे हे शब्द आहेत, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जे तो उघडतो, ते कोणी बंद करू शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 फिलदेल्फिया येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ दावीदची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कुणाला बंद करता येत नाही आणि ज्याने बंद केल्यावर कुणाला उघडता येत नाही, तो असे म्हणतो -

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “फिलदेल्फिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे पवित्र व सत्य आहे, ज्यांच्याजवळ दावीदाची किल्ली आहे, ते जे उघडतात, ते कोणालाही बंद करता येत नाही आणि ते जे बंद करतात, ते कोणाला उघडता येत नाही, ते असे म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 3:7
38 Iomraidhean Croise  

भ्रमण करीत असता त्याने एखाद्याला पकडून अटकेत टाकले, आणि न्यायसभा भरवली, तर त्याचा हात कोण धरील?


पाहा, तो जे मोडतो ते पुन्हा उभारता येत नाही; त्याने एखाद्याला बंधनात ठेवले तर त्याला कोणाच्याने खुले करवत नाही.


परमेश्वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यांत दयाळू आहे.


कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस;


आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे; आमचा राजाही इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा आहे.


दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यांवर ठेवीन; त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही; त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही.


मार्गातून निघा, वाटेवरून दूर व्हा, आमच्यासमोरून इस्राएलाच्या पवित्र प्रभूस दूर करा.”


हे कीटका, याकोबा, इस्राएलाचे लोकहो, भिऊ नका, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला साहाय्य करतो; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे.


तू त्यांना उफणशील, वारा त्यांना उडवून टाकील, वावटळ त्यांना उधळून देईल; आणि तू परमेश्वराच्या ठायी उल्लास पावशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील.


येणेकरून लोक तत्काळ पाहतील, जाणतील, मनन करतील व समजतील की, परमेश्वराच्या हातून हे झाले आहे; इस्राएलाच्या पवित्र प्रभूने हे उत्पन्न केले आहे.


आमच्या उद्धारकर्त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे आहे.


परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो : “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.


ज्याला माणसे तुच्छ लेखतात, ज्याला लोक अमंगल मानतात, जो अधिपतींचा दास आहे, त्याला इस्राएलाचा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू जो परमेश्वर, तो म्हणतो, “राजे तुला पाहून उठून उभे राहतील, अधिपती तुला नमन करतील. परमेश्वर जो सत्यवचनी आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे, त्याने तुला निवडून घेतले आहे म्हणून असे होईल.”


कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे; त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात.


पाहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील; ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल; ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू ह्याच्यामुळे असे होईल.


ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1


मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”


आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.


तो ओरडून म्हणाला, “हे येशू नासरेथकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करायला आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच!”


तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल;


“अरे येशू नासरेथकरा! ‘तू आमच्यामध्ये का पडतोस?’ तू आमचा नाश करण्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र (पुरुष) तो.”


येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.


जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले, आणि ‘खुनी पुरुष आम्हांला द्या’ अशी मागणी केली.


आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.


ती म्हणाली, “[मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे;] तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि ते [आशियातील] इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया येथील सात मंडळ्यांकडे पाठव.”


मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


आणि ‘विश्वसनीय साक्षी,’ मेलेल्यांमधून ‘प्रथम जन्मलेला’ व ‘पृथ्वीवरील राजांचा अधिपती’ येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकांतून मुक्त केले,’


‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्‍याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’


नंतर मी वेदीला1 असे बोलताना ऐकले, “हो, ‘हे प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझे न्याय सत्य’ व ‘नीतीचे’ आहेत!”


‘नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला’, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. ‘तो नीतीने न्यायनिवाडा करतो’ व लढतो.


कारण ‘त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे’ व ‘नीतीचे’ आहेत; ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आणि आपल्या ‘दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.”’


इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही : जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो,


तेव्हा ‘राजासनावर बसलेला’ म्हणाला, “‘पाहा, मी’ सर्व गोष्टी ‘नवीन करतो.”’ तो म्हणाला, “लिही; कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.”


लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘जो आमेन, जो ‘विश्वसनीय’ व खरा ‘साक्षी’, जो देवाच्या ‘सृष्टीचे आदिकारण’ तो असे म्हणतो :


त्या चारही प्राण्यांना ‘प्रत्येकी सहा-सहा पंख असून ते प्राणी’ आतून ‘बाहेरून सर्वांगी, डोळ्यांनी भरलेले’ होते; आणि, “पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, ‘जो आहे’ व जो येणार तो ‘सर्वसमर्थ प्रभू देव,”’ असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत.


ते ‘नवे गीत गाऊन’ म्हणतात : “तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस; कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून 1आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत


ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणार्‍या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan