Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 22:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस; मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा दास आहे; नमन देवाला कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 परंतु तो देवदूत मला म्हणाला, “असे करू नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक दास आहे. देवाला नमन कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. तू, संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. देवाची आराधना कर!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. तू परमेश्वराची आराधना कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 22:9
19 Iomraidhean Croise  

तर परमेश्वराने महासामर्थ्याने व हात लांब करून तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले त्याचे भय धरा, त्याची आराधना करा आणि त्यालाच बली अर्पा.


म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल; तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग.


कारण तुला दुसर्‍या कोणत्याही देवाला नमन करायचे नाही; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे, तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे;


आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्वकाही तुला देईन.”


म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल.”


अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये; हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहेत.


आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.


येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण : हे त्याला देवाकडून झाले. ‘ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या’ आपल्या दासांना दर्शवण्याकरता हे झाले; आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्याला कळवले.


ती म्हणाली, “[मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे;] तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि ते [आशियातील] इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया येथील सात मंडळ्यांकडे पाठव.”


तो मोठ्याने म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करायची त्याची घटिका आली आहे. ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र’ व पाण्याचे झरे ‘निर्माण केले,’ त्याला नमन करा.”


‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’ कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत, म्हणून ‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.”’


तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो; परंतु तो मला म्हणाला, “असे करू नये; मी तुझ्या सोबतीचा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर;” कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म1 आहे.


पुन्हा तो मला म्हणाला, “ह्या ‘पुस्तकातील’ संदेशवचने ‘शिक्का मारून बंद करू नकोस;’ कारण ‘वेळ’ जवळ आली आहे.


ह्या पुस्तकातील ‘संदेशवचने’ ऐकणार्‍या प्रत्येकाला मी निश्‍चयपूर्वक सांगतो की, जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव आणील;


‘पाहा, मी लवकर येतो.’ ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य.


तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील ‘राजासनावर जो बसलेला’ त्याच्या पाया पडतात; जो ‘युगानुयुग जिवंत’ त्याला नमन करतात; आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात,


त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी ‘आपल्या हातच्या कृत्यांविषयी’ पश्‍चात्ताप केला नाही; म्हणजे, ‘भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची’ पूजा करणे त्यांनी सोडले नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan