Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 22:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ह्या पुस्तकातील ‘संदेशवचने’ ऐकणार्‍या प्रत्येकाला मी निश्‍चयपूर्वक सांगतो की, जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव आणील;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 या पुस्तकात भविष्यकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्यास मी गंभीरपणे सावधान करतोः जर कोणी ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणील;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 ह्या पुस्तकातील संदेशवचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी योहान इशारा देऊन सांगतो की, जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 या पुस्तकातील संदेश ऐकणार्‍या प्रत्येकाला मी सावध करतो: या ग्रंथपटात जे लिहिले आहे त्यात कोणी भर घातली, तर परमेश्वर त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा आणेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 22:18
23 Iomraidhean Croise  

त्याच्या वचनांत तू काही भर घालू नकोस, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील.


इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हांला सातपट शिक्षा करीन,


तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


कोणी पाठीस लागले नसताही ते तलवारच पाठीस लागल्यासारखे अडखळून एकमेकांवर पडतील; तुमच्या शत्रूंशी सामना करण्यासाठी तुमच्यात त्राण उरणार नाही.


त्याने उत्तर दिले, “माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल.


म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्‍चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये;


मी तुला आज्ञापीत आहे ती प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाळ; तिच्यात अधिकउणे काही करू नकोस.


जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे तिच्यात काही अधिकउणे करू नका, अशासाठी की, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हांला देत आहे त्या तुम्ही पाळाव्यात.


कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते.


ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य; कारण समय जवळ आला आहे.


नंतर मी अत्यंत आश्‍चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले; ‘सात पीडा’ घेतलेले सात देवदूत दृष्टीस पडले; त्या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला.


आणि स्वच्छ व तेजस्वी ‘तागाची वस्त्रे परिधान केलेले’ व छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेले असे, ‘सात पीडा’ घेतलेले ते सात देवदूत त्या मंदिरातून निघाले.


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


त्यांना ठकवणार्‍या सैतानाला ‘अग्नीच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; त्यात ते श्वापद व खोटा संदेष्टा आहे; तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.


ज्या कोणाचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही’ तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला.


पुन्हा तो मला म्हणाला, “ह्या ‘पुस्तकातील’ संदेशवचने ‘शिक्का मारून बंद करू नकोस;’ कारण ‘वेळ’ जवळ आली आहे.


ह्या गोष्टींविषयी तुम्हांला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळ्यांकरता पाठवले आहे. मी दाविदाचा ‘अंकुर’ आहे व त्याचे संतानही; मी पहाटचा तेजस्वी तारा आहे.”


‘पाहा, मी लवकर येतो.’ ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य.


परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस; मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा दास आहे; नमन देवाला कर.”


लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘जो आमेन, जो ‘विश्वसनीय’ व खरा ‘साक्षी’, जो देवाच्या ‘सृष्टीचे आदिकारण’ तो असे म्हणतो :


Lean sinn:

Sanasan


Sanasan