Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 21:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा ‘राजासनावर बसलेला’ म्हणाला, “‘पाहा, मी’ सर्व गोष्टी ‘नवीन करतो.”’ तो म्हणाला, “लिही; कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा राजासनावर बसलेला म्हणालाः “पाहा, मी सर्वकाही नवीन करतो आणि तो मला म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, “पहा! मी सर्व गोष्टी नवीन करतो!” तो मला असेही म्हणाला, “लिही, कारण ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जे राजासनावर बसले होते ते म्हणाले, “मी सर्वकाही नवीन करीत आहे!” मग ते म्हणाले, “हे लिहून घे; कारण ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 21:5
14 Iomraidhean Croise  

पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत; नव्या गोष्टी मी विदित करतो; त्यांना आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हांला ऐकवतो.”


पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन.


म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालावा, [म्हणजे दोन्हीही टिकतात.]


म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती1 आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.


“आणखी एकदा” ह्याचा अर्थ असा होतो की, घडवलेल्या वस्तूंप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील; ते ह्यासाठी की न हलवलेल्या वस्तू टिकून राहाव्यात.


ती म्हणाली, “[मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे;] तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि ते [आशियातील] इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया येथील सात मंडळ्यांकडे पाठव.”


म्हणून जे तू पाहिले, जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव;


तेव्हा तो मला म्हणाला, “हे लिही की, कोकर्‍याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.”


‘नंतर’ मोठे पांढरे ‘राजासन’ व त्यावर ‘बसलेला’ एक जण ‘माझ्या दृष्टीस पडला;’ त्याच्या ‘तोंडापुढून पृथ्वी’ व आकाश हे ‘पळाले; त्यांकरता ठिकाण उरले नाही.’


‘आणि’ जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही ‘काढून टाकील’ त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील.3


नंतर तो मला म्हणाला, “ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत; आणि संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा2 देव जो प्रभू त्याने ज्या गोष्टी लवकर ‘घडून आल्या पाहिजेत’ त्या गोष्टी आपल्या दासांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवले आहे.


लगेचच मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते, आणि ‘त्या राजासनावर कोणीएक बसलेला होता.’


‘राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे’ त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करतात,


‘जो राजासनावर बसलेला होता’ त्याच्या उजव्या हातात ‘पाठपोट लिहिलेली’ व सात शिक्के ‘मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी’ मी पाहिली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan