Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 21:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 नगरीच्या तटाला बारा पाये होते, त्यांच्यावर कोकर्‍याच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आणि नगरीच्या तटाला बारा पाये होते; त्यावर कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 नगरीच्या तटाच्या पायासाठी शिला वापरल्या होत्या. त्यांवर कोकराच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 नगरीच्या तटबंदीला बारा पाये होते. या पायांवर कोकर्‍याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 21:14
14 Iomraidhean Croise  

अगे पिडलेले, वादळांनी त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन आणि नीलमण्यांनी तुझा पाया घालीन.


आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.


मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.


आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.


प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात; स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे;


ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्ट्यांना प्रकट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्यसंतानांना कळवण्यात आले नव्हते.


आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले;


कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता.


परंतु प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा;


‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी ‘आनंद करा;’ कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’


‘पूर्वेकडे तीन वेशी; उत्तरेकडे तीन वेशी; दक्षिणेकडे तीन वेशी; व पश्‍चिमेकडे तीन वेशी होत्या.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan