Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 21:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नंतर मी ‘नवे आकाश व नवी पृथ्वी’ ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 नंतर मी, “एक नवी पृथ्वी व एक नवे आकाश” पाहिले, कारण पहिले आकाश व पहिल्या पृथ्वीचे अस्तित्व राहिले नसून त्यात समुद्र अस्तित्वात नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 21:1
13 Iomraidhean Croise  

त्या दिवशी परमेश्वर आपल्या दु:खकर, महान व बलवान खड्गाने चपल सर्प लिव्याथान व वक्र सर्प लिव्याथान ह्यांचे पारिपत्य करील; समुद्रातील अजगराला ठार मारील.


परमेश्वराने उद्धरलेले जन परततील व जयजयकार करत सीयोनेस येतील; त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील; त्यांना आनंद व उल्लास प्राप्त होईल; दुःख व उसासे पळ काढतील.


दुर्जन खवळलेल्या सागरासारखे आहेत; त्यांच्याने स्थिर राहवत नाही; त्यांच्या लाटा चिखल व गाळ बाहेर टाकतात.


कारण मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीन; ती जशी माझ्यासमोर टिकून राहतील तसा तुमचा वंश व तुमचे नाव टिकून राहील असे परमेश्वर म्हणतो.


आणि भिन्नभिन्न अशी चार मोठाली श्वापदे समुद्रातून बाहेर निघाली.


सृष्टीही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते.


तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.1


तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते असे ‘नवे आकाश’ व ‘नवी पृथ्वी’ ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.


नंतर मी एक ‘श्वापद समुद्रातून वर येताना’ पाहिले; त्याला ‘दहा शिंगे’ व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती.


‘नंतर’ मोठे पांढरे ‘राजासन’ व त्यावर ‘बसलेला’ एक जण ‘माझ्या दृष्टीस पडला;’ त्याच्या ‘तोंडापुढून पृथ्वी’ व आकाश हे ‘पळाले; त्यांकरता ठिकाण उरले नाही.’


तेव्हा ‘राजासनावर बसलेला’ म्हणाला, “‘पाहा, मी’ सर्व गोष्टी ‘नवीन करतो.”’ तो म्हणाला, “लिही; कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.”


‘एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश’ गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणांवरून ढळली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan