Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 2:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. कारण ईजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणवते, आणि ‘जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास’ माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परंतु तुमच्याविरुध्द माझे म्हणणे आहेः ईजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या दासांना अनैतिक व्यभिचाराचे पाप व मूर्तींना वाहिलेले अन्न खावयास भूलविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करू देता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 परंतु तुला दोष देणे मला क्रमप्राप्त आहे, कारण ईजबेल नावाची जी स्त्री स्वतःला संदेश देणारी म्हणविते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: ईजबेल नावाची जी स्त्री स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि लैंगिक अनीती करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या सेवकांना तिच्या शिकवणीने भुलविते, तिचे तुम्ही सहन करता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 2:20
19 Iomraidhean Croise  

नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या पापकर्मांचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सीदोन्यांचा राजा एथबाल ह्याची कन्या ईजबेल हिच्याशी लग्न केले, आणि तो बआलमूर्तीची सेवा व पूजा करू लागला.


एलीया तिला म्हणाला, “भिऊ नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज.


त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील.”


योरामाने येहूला पाहिले तेव्हा तो म्हणाला, “येहू, सर्वकाही ठीक आहे ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार व गारुडे ह्यांचा सपाटा जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार?”


ईजबेलीच्या हातून माझे सेवक जे संदेष्टे आणि परमेश्वराचे दुसरे सर्व सेवक ह्यांचा रक्तपात झाला आहे त्याचा मला सूड घेणे आहे, म्हणून आपला धनी अहाब ह्याच्या घराण्याचा तू संहार कर.


तू सावध राहा. देशातील रहिवाशांशी तुला करारमदार करायचा नाही; नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील, आणि त्यांच्यातल्या कोणी तुला बोलावले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील;


आणखी हे मानवपुत्रा, आपल्याच मनातील संदेश देणार्‍या तुझ्या लोकांच्या कन्यांकडे तोंड करून त्यांच्याविरुद्ध संदेश दे.


तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तींचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा.


त्या म्हणजे मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावीत; ह्यांपासून स्वत:ला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशल असो.”


परंतु कोणी तुम्हांला सांगितले की, “हा मूर्तीचा नैवेद्य आहे,” तर ज्याने हे सुचवले त्याच्याखातर व सदसद्विवेक-बुद्धीखातर खाऊ नका. [कारण पृथ्वी व तिच्यावरील परिपूर्णता प्रभूची आहे.]


तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे; त्या ह्या की, ‘बलामाच्या’ शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत; त्याने ‘मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे,’ हे अडखळण ‘इस्राएलाच्या संतानांपुढे’ ठेवण्यास बालाकाला शिकवले.


तरी तू आपली पहिली प्रीती सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan