Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत,’ आणि ‘ज्याचे पाय सोनपितळेसारखे’ आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या सोनपितळासारखे आहेत तो देवाचा पुत्र हे सांगत आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 थुवतीरा येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चकचकीत सोनपितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो -

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “थुवतीरा येथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्याचे नेत्र आगीच्या ज्वालेसारखे भेदक आहेत व ज्याचे पाय चकाकत्या कास्यासारखा आहेत, ते परमेश्वराचे पुत्र असे म्हणतात:

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 2:18
22 Iomraidhean Croise  

मी परमेश्वराचा निर्णय कळवतो; तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे;


त्याचे शरीर वैडूर्यमण्यासारखे असून त्याचे मुख विद्युल्लतेसारखे होते. त्याचे नेत्र पेटलेल्या दीपांसमान होते, त्याचे हातपाय उज्ज्वल पितळेसारखे होते आणि त्याच्या शब्दाचा ध्वनी एखाद्या समुदायाच्या गजबजाटासारखा होता.


तो बोलत आहे इतक्यात, पाहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली; आणि पाहा, मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे;’ ह्याचे तुम्ही ऐका.”


शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले.


आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”’


देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.


शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.


नथनेल त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलाचे राजे आहात.”


तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटल्यावरून ‘तुम्ही दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?


देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.


जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय-निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे; कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही.


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे.


तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे; ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंत:करण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.


मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा षंढ म्हणाला, “पाहा हे पाणी; मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?”


व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्‍चित ठरला.


ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्वकाही कसे देणार नाही?


ती म्हणाली, “[मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे;] तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि ते [आशियातील] इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया येथील सात मंडळ्यांकडे पाठव.”


इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही : जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो,


थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, ज्यांना सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाहीत त्या तुम्हांला मी सांगतो की, मी तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan