Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही : जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 “इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोन्याच्या समयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेत

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 इफिस येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो व जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो -

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “इफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे आपल्या उजव्या हातात सात तारे धरतात व जे सोन्याच्या सात समयांमध्ये चालतात, ते असे म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 2:1
20 Iomraidhean Croise  

ते प्रवेश करीत असता अधिपतीने त्यांच्यात मिसळून आत यावे; ते बाहेर जातानाही त्याने त्यांच्याबरोबर जावे.


कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता, आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करण्यास राजी झालात.


मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यांना तेथे सोडले; आणि स्वत: सभास्थानात जाऊन यहूद्यांबरोबर वादविवाद केला.


तर त्यांचा निरोप घेताना, “देवाची इच्छा असल्यास [येणार्‍या सणात यरुशलेमेत] मी तुमच्याकडे पुन्हा येईन” असे म्हणून तो तारवात बसून इफिसाहून निघाला.


मग असे झाले की, अपुल्लो करिंथात असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहचला; तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले.


देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत; देवाने असे म्हटले आहे की, “‘मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन. मी त्यांचा देव होईन, व ते माझे लोक होतील.’


त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा ‘परमतेजाने’ प्रकाशणार्‍या ‘सूर्यासारखी’ होती.


जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे, आणि सोन्याच्या त्या सात समयांचे ‘गूज’ हे आहे; ते सात तारे हे सात मंडळ्यांचे दूत आहेत; आणि सात समया ज्या तू पाहिल्या त्या सात मंडळ्या आहेत.


नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले ते हे : एक स्त्री दिसली, ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा तार्‍यांचा मुकुट होता.


पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही : ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो,


थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत,’ आणि ‘ज्याचे पाय सोनपितळेसारखे’ आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो :


स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिही; जो पहिला व’ शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो :


सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे आहेत व सात तारे आहेत तो असे म्हणतो : तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस.


लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘जो आमेन, जो ‘विश्वसनीय’ व खरा ‘साक्षी’, जो देवाच्या ‘सृष्टीचे आदिकारण’ तो असे म्हणतो :


फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ ‘दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही,’ तो असे म्हणतो :


Lean sinn:

Sanasan


Sanasan