Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 19:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 इतक्यात ‘राजासनापासून’ वाणी झाली; ती म्हणाली, “अहो आमच्या देवाची ‘भीती बाळगणार्‍या सर्व लहानथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आणि राजासनाकडून एक वाणी आली; ती म्हणालीः तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहानमोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिणारे, आपल्या देवाची स्तुती करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 इतक्यात राजासनाकडून वाणी झाली, ती म्हणाली, “अहो, आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लाहनथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा राजासनातून एक वाणी निघाली. ती म्हणाली, “परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या त्यांच्या सर्व लहान थोर सेवकहो, आपल्या परमेश्वराचे स्तवन करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 19:5
14 Iomraidhean Croise  

परमेश्वराचे भय धरणार्‍या लहानथोरांना तो आशीर्वाद देईल.


परमेश्वराच्या घरात प्रतिरात्री उभे राहणारे, परमेश्वराचे सर्व सेवकहो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा;


परमेशाचे स्तवन करा!2 परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा; परमेश्वराचे सेवकहो, स्तवन करा;


प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा!1


अहो परमेश्वराचे भय धरणार्‍यांनो, त्याचे स्तवन करा; याकोबाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचा गौरव करा; इस्राएलाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचे भय धरा.


लहानथोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास, ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी;


सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मोठी ‘वाणी [स्वर्गाच्या] मंदिरातून,’ राजासनापासून निघाली; ती म्हणाली, “झाले!”


राजाचे’ मांस, सरदारांचे मांस, ‘बलवानांचे मांस, घोड्यांचे’ व त्यांवरील स्वारांचे मांस, आणि स्वतंत्र व दास, लहानमोठे, अशा सर्वांचे मांस ‘खाण्यास’ या.”


मग मृत झालेल्या लहानथोरांना मी [देवाच्या] राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी ‘पुस्तके उघडली गेली;’ तेव्हा दुसरे एक ‘पुस्तक’ उघडले गेले ते ‘जीवनाचे’ होते; आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ‘ज्यांच्या-त्यांच्या कृत्यांप्रमाणे’ ठरवण्यात आला.


ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि ‘राजासनावर बसलेला’ त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan