Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 19:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तेव्हा ते चोवीस वडील व ते चार प्राणी उपडे पडून ‘राजासनावर बसलेल्या’ देवाला नमन करताना म्हणाले, “आमेन; हालेलूया!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेव्हा ते चोवीस वडील व चार जिवंत प्राणी पालथे पडले, त्यांनी राजासनावर बसलेल्या देवाला नमन केले आणि ते म्हणालेः आमेन; हालेलूया.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तेव्हा ते चोवीस वडीलजन व ते चार प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाची आराधना करीत म्हणाले, “आमेन! हालेलूया!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तेव्हा ते चोवीस वडीलजन व चार सजीव प्राणी यांनी राजासनावर बसलेल्या परमेश्वरासमोर दंडवत घालून त्यांना नमन करीत म्हटले, “आमेन! हाल्लेलूयाह!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 19:4
20 Iomraidhean Croise  

इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादी काळापासून अनंत काळापर्यंत धन्यवाद होवो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.


ह्यावर मी आपला पदर झटकून म्हणालो, “जो कोणी ह्या वचनाप्रमाणे करणार नाही त्याला परमेश्वर त्याच्या घरातून व त्याच्या उद्योगावरून झटकून टाकील ह्याप्रमाणे तो झटकला जाऊन खंक होईल.” तेव्हा सर्व मंडळीने म्हटले, “आमेन” व त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले. मग लोकांनी आपण दिलेल्या वचनाप्रमाणे केले.


मग एज्राने देवाधिदेव परमेश्वर ह्याचा धन्यवाद केला; व सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन!” असे म्हटले आणि आपली डोकी लववून आणि आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास प्रणाम केला.


पृथ्वीवरून पातकी नष्ट होवोत; ह्यापुढे दुर्जन न उरोत. हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेशाचे स्तवन करा!1


इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादि कालापासून अनंतकालपर्यंत धन्यवाद होवो. सर्व लोक “आमेन” म्हणोत. परमेशाचे स्तवन करा!1


इस्राएलाचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन, आमेन.


त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो; त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन! आमेन!


परमेश्वर सदासर्वकाळ धन्यवादित असो. आमेन, आमेन.


“आमेन! परमेश्वर असे करो! परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे व बंदिवासातले सर्व लोक बाबेलहून ह्या स्थळी परत आणण्याविषयी जी वचने तू संदेशरूपाने सांगितली त्यांप्रमाणे परमेश्वर करो.


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’]


तू केवळ आत्म्याने धन्यवाद केलास, तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकारस्तुतीला “आमेन” कसे म्हणेल? कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही.


त्या चार प्राण्यांपैकी एकाने युगानुयुग जिवंत असणार्‍या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या सात वाट्या त्या सात देवदूतांना दिल्या.


ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘हालेलूया!’ तारण, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही प्रभू जो आमचा देव ह्याची आहेत;


ते दुसर्‍यांदा म्हणाले, “हालेलूया! तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.”


तेव्हा ‘जणू काय’ मोठ्या ‘समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी’ व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला; तो म्हणाला, “‘हालेलूया; कारण’ सर्वसमर्थ आमचा ‘प्रभू’ देव ह्याने ‘राज्य हाती घेतले आहे.


तेव्हा ते चार प्राणी म्हणाले, “आमेन!” आणि चोवीस वडिलांनी [जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याला] पाया पडून नमन केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan