Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 19:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मग त्या पशूला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले; त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून, त्या पशूने शिक्का घेणाऱ्यांस व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांस फसवले होते. या दोघांनाही गंधकाने जळणाऱ्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीची आराधना करणाऱ्या लोकांना त्याच्यासमोर चमत्कार करून ठकविले होते. ह्या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्या पशूला आणि त्याच्याबरोबर त्या खोट्या भविष्यवाद्याला कैद करण्यात आले. हा खोटा संदेष्टे, पशूच्या वतीने आपल्या चमत्कारांनी ज्यांनी त्या पशूची खूण धारण केली होती आणि जे त्याच्या मूर्तीची उपासना करीत असत, त्यांना फसविले होते. त्या दोघांनाही गंधकाने सतत जळत राहणार्‍या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 19:20
30 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांच्यावर गंधक व अग्नी ह्यांचा वर्षाव आकाशातून केला;


जे त्याचे नव्हत ते त्याच्या डेर्‍यात वास करतील त्याच्या वसतिस्थानांवर गंधक उधळतील.


दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील, अग्नी, गंधक व दाहक वारा ह्यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल.


कारण पूर्वीच तोफेत (दहनस्थान) तयार केले आहे; ते राजासाठी सिद्ध केले आहे; ते खोल व रुंद केले आहे; त्याच्या चितेसाठी विस्तव व भरपूर लाकडे आहेत; गंधकाच्या धारेसारखा परमेश्वराचा फुंकर ती पेटवतो.


त्याचे ओढे राळ बनतील, त्याची धूळ गंधक होईल व त्याचा देश राळेसारखा जळेल.


कळपातून एक चांगले मेंढरू निवडून घे; हाडे शिजवण्यासाठी खाली लाकडांची रास कर; ते चांगले शिजू दे; त्यातील हाडेही चांगली शिजू दे.


मरी व रक्तपात ह्यांनी मी त्याच्याबरोबर वाद मांडीन; त्याच्यावर, त्याच्या सैन्यावर पाऊस, मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांची धो-धो वृष्टी मी त्याच्याबरोबर असलेल्या अनेक लोकसमूहांवर करीन.


समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील; पण त्याचा अंत येईल, कोणी त्याला साहाय्य करणार नाही.”


त्याची सत्ता बलवत्तर होईल; तथापि ती अशी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने होणार नाही; तो विलक्षण नाश करील. तो उत्कर्ष पावेल आणि आपला मनोरथ सिद्धीस नेईल; तो समर्थ व पवित्र लोकांचा नाश करील.


हा जो अहोरात्रीचा3 दृष्टान्त सांगितला तो खरा आहे; हा दृष्टान्त गुप्त ठेव, कारण तो दीर्घकाळास लागू आहे.”


खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत.


आणि हा सर्व देश गंधक व खार ह्यांनी इतका जळून गेला आहे की, येथे काही पेरणीकापणी होत नाही, येथे गवत उगवत नाही, पण परमेश्वराने कोपायमान व क्रोधयुक्त होऊन सदोम, गमोरा, अदमा व सबोईम ह्यांचा विध्वंस केला तसा ह्याचाही केला आहे, हे त्यांना दिसेल;


आय नगराच्या राजाला त्यांनी जिवंत धरून यहोशवाकडे आणले.


तोही ‘देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला’ त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल, आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकर्‍यासमक्ष त्याला ‘अग्नी व गंधक’ ह्यांपासून पीडा होईल.


जी ‘दहा शिंगे’ तू पाहिलीस ‘ती दहा राजे आहेत,’ त्यांना अद्यापि राज्य मिळालेले नाही; तरी त्यांना श्वापदाबरोबर एक तास राजांच्यासारखा अधिकार मिळतो.


तेव्हा ते श्वापद, ‘पृथ्वीवरील राजे’ व त्यांची सैन्ये ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यास ‘एकत्र झालेली’ मी पाहिली.


त्यांना ठकवणार्‍या सैतानाला ‘अग्नीच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; त्यात ते श्वापद व खोटा संदेष्टा आहे; तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.


त्या दृष्टान्तात घोडे व त्यांच्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे : त्यांना अग्नी, नीळ व गंधक ह्यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती; आणि त्यांच्या तोंडांतून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan