Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 18:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘माझ्या लोकांनो,’ तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून ‘तिच्यामधून निघा.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग मी स्वर्गातून आणखी एक वाणी ऐकली; ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर या. म्हणजे तुम्ही तिच्या पापात भागीदार होऊ नये आणि यासाठी की, तिच्या कोणत्याही पीडा तुमच्यावर येऊ नयेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली, ती म्हणाली: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुमच्यावर तिच्या विपत्तींमधील कोणतीही विपत्ती ओढवू नये म्हणून तिच्यामधून बाहेर पडा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मग मी स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी ऐकली, ती म्हणाली: “ ‘माझ्या लोकांनो, तिच्यापासून दूर व्हा,’ तिच्या पापात वाटेकरी होऊ नका, नाही तर, तिच्याबरोबर तुम्हालाही पीडा भोगावी लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 18:4
16 Iomraidhean Croise  

तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या1 आपल्या जावयांना म्हणाला, “उठा, ह्या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर ह्या नगराचा नाश करणार आहे;” परंतु त्याच्या जावयांना तो केवळ गंमत करत आहे असे भासले.


तू चोर पाहिलास की तुला त्याच्या संगतीत आनंद होतो; तू व्यभिचारी माणसांचा साथीदार आहेस.


तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”


निघा, निघा, तेथून निघून जा; अशुद्ध वस्तूला शिवू नका; तिच्यामधून निघून जा; परमेश्वराची पात्रे वाह-णार्‍यांनो, तुम्ही आपणांस शुद्ध करा.


बाबेलातून पळून जा, खास्द्यांच्या देशातून निघून जा; कळपाच्या पुढे चालणार्‍या एडक्यांसारखे व्हा.


माझ्या लोकांनो, तुम्ही त्यांच्यातून निघून जा! परमेश्वराच्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा.


जे तुम्ही तलवारीपासून निभावला आहात ते तुम्ही निघून जा, थांबू नका! दुरून परमेश्वराचे स्मरण करा, यरुशलेम आपल्या मनात वागवा.


बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा; त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका; कारण हा परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे; त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे.


आम्ही बाबेलास बरे करण्याचा प्रयत्न केला, पण तो बरा झाला नाही; त्याला सोडून द्या; चला, आपण सर्व आपापल्या देशाला जाऊ; कारण त्याचा गुन्हा गगनापर्यंत पोहचला आहे, आकाशापर्यंत चढला आहे.


आणि म्हणता, ‘आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’


म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’


उतावळीने कोणावर हात ठेवू नकोस, आणि दुसर्‍यांच्या पापात तुझे अंग असू नये; स्वतःला शुद्ध राख.


कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan