Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 18:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 ‘दिव्याचा उजेड’ तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही; ‘आणि नवरानवरीचा शब्द’ तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणारच नाही; तुझे ‘व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक’ होते; आणि सर्व राष्ट्रे ‘तुझ्या चेटकाने’ ठकवली गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 आणि तुझ्यात दिव्याचा उजेड. ह्यापुढे कधी दिसणार नाही; तुझ्यात वराचा आणि वधूचा आवाज ह्यापुढे ऐकू येणार नाही. कारण तुझे व्यापारी हे पृथ्वीचे मोठे लोक होते; आणि तुझ्या जादूटोण्यांनी सर्व राष्ट्रे फसवली गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 दिव्यांचा उजेड ह्यापुढे तुझ्यात दिसणार नाही आणि वधूवरांची वाणी ह्यापुढे तुझ्यात ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली होती!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 दिव्यांचा प्रकाश यापुढे तुझ्यावर उजळणार नाही आणि वधूवरांची वाणी पुन्हा ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते. सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 18:23
26 Iomraidhean Croise  

योरामाने येहूला पाहिले तेव्हा तो म्हणाला, “येहू, सर्वकाही ठीक आहे ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार व गारुडे ह्यांचा सपाटा जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार?”


दुष्टांचा दीप मालवला व त्यांच्यावर विपत्ती आली; देवाने त्यांच्यावर कोप करून त्यांना दुःखाचे वाटेकरी केले; असे कितीदा होते?


कारण दुष्कर्म्यास चांगली गती नाही; दुर्जनांचा दीप मालवेल.


सोर ही राजमुकुटदात्री; तिचे व्यापारी सरदार, तिचे उदमी जगातले महाजन; तिच्याविरुद्ध हे कोणी योजले?


अपत्यहीनता व वैधव्य ही दोन्ही एकाच दिवशी, एकाच क्षणी तुला प्राप्त होतील; तुझे बहुविध मंत्रतंत्र व तुझी विपुल चेटके ह्यांना न जुमानता ती तुझ्यावर पूर्णपणे गुदरतील.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, तुमच्या हयातीत, तुमच्या डोळ्यांपुढे ह्या ठिकाणातून खुशालीचा व आनंदाचा शब्द, नवर्‍याचा व नवरीचा शब्द नाहीसा होईल असे मी करीन.


त्यांमधून आनंदाचा व उल्लासाचा शब्द, नवर्‍याचा व नवरीचा शब्द, जात्याची घरघर व दिव्याचा प्रकाश ही नाहीतशी करीन.


हर्षाचा व आनंदाचा शब्द, वराचा व वधूचा शब्द, यहूदाच्या नगरांतून व यरुशलेमेच्या रस्त्यांतून बंद पडेल असे मी करीन; कारण भूमी वैराण होईल.


सुरूप व चेटकात निपुण अशा त्या वेश्येच्या बहुत व्यभिचारांमुळे हे घडले आहे; ती आपल्या व्यभिचारांनी राष्ट्रांचा, आपल्या चेटकांनी वंशांचा विक्रय करते.


त्याने त्यांना बर्‍याच दिवसांपासून आपल्या जादूगिरीने थक्क केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्याकडे होते.


मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल1 व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.


‘तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले’ आणि ‘तिच्या’ जारकर्मरूपी ‘द्राक्षारसाने पृथ्वीवर’ राहणारे ‘मस्त झाले.”’


तिच्या कपाळावर “मोठी बाबेल, कलावंतिणींची1 व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,” हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते.


वीणा वाजवणारे, ‘गवई’, पावा वाजवणारे व कर्णा वाजवणारे ह्यांचा ‘नाद’ तुझ्यात ‘ह्यापुढे ऐकूच येणार नाही;’ कसल्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणारच नाही; ‘आणि जात्याचा आवाज’ तुझ्यात ह्यापुढे ऐकूच येणार नाही;


कारण, ‘तिच्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रे प्याली आहेत; पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ केले व पृथ्वीवरील व्यापारी तिने आपल्या विषयभोगास खर्चलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले.”


‘पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ व विलास ‘केला’ ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हा तिच्याकरता ‘रडतील व ऊर बडवून घेतील.’


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.


पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा ‘सूर्याच्या प्रकाशाची’ गरज नाही; कारण प्रभू देव त्यांच्यावर ‘प्रकाश पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.’


‘पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी’, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, ‘गुहांत’ व डोंगरांतील ‘खडकांतून लपली;’


आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, ‘चेटके, जारकर्म व चोर्‍या’ ह्यांबद्दलही पश्‍चात्ताप केला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan