प्रकटी 18:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 वीणा वाजवणारे, ‘गवई’, पावा वाजवणारे व कर्णा वाजवणारे ह्यांचा ‘नाद’ तुझ्यात ‘ह्यापुढे ऐकूच येणार नाही;’ कसल्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणारच नाही; ‘आणि जात्याचा आवाज’ तुझ्यात ह्यापुढे ऐकूच येणार नाही; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तुझ्यात वीणा वाजविणाऱ्यांचा आवाज, संगीतकार, बासरी आणि कर्णे वाजविणाऱ्यांचा आवाज ह्यापुढे कधी ऐकू येणार नाही. तुझ्यात कोणत्याही धंद्याचा कारागीर ह्यापुढे कधी आढळणार नाही; आणि तुझ्यात जात्याचा आवाज ह्यापुढे कधी ऐकू येणार नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 वीणा, पावा व कर्णा वाजविणारे ह्यांचा नाद तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणार नाही. कसल्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणार नाही आणि जात्याचा आवाज ह्यापुढे तुझ्यात ऐकू येणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्या नगरीत आता कर्णे, वीणा, बासरी, यांचा सूरही कधी ऐकू येणार नाही. तिथे कसल्याच प्रकारचे उद्योगधंदे पुन्हा आढळणार नाहीत. तिथे गिरणीचा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही. Faic an caibideil |
त्यांत आनंद व हर्ष ह्यांचा ध्वनी होईल, नवर्याची व नवरीची वाणी ऐकू येईल; ‘सेनाधीश परमेश्वराची स्तुती असो, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सर्वकाळची आहे,’ असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतात त्यांचा शब्द पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास उलटवून आरंभी होते तसे सर्वकाही करीन, असे परमेश्वर म्हणतो.