प्रकटी 18:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ‘त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत, शोक करत व आक्रोश करत’ म्हटले, अरेरे, ‘जिच्या’ धनसंपत्तीने ‘समुद्रातील गलबतांचे सगळे’ मालक ‘श्रीमंत झाले’ ती मोठी नगरी! तिची एका घटकेत ‘राखरांगोळी झाली!’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आणि त्यांनी आपल्या डोक्यांत धूळ घातली व ते रडत आणि शोक करीत ओरडून म्हणाले, हाय! ही महान नगरी! समुद्रावर ज्यांची गलबत होती ते सर्व हिच्या संपत्तीवर सधन झालेत! कारण ही एका घटकेत उजाड झाली. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 त्यांनी आपल्या डोक्यांवर धूळ उडवली आणि रडत, शोक करीत व आक्रोश करीत म्हटले, “अरेरे, किती भयंकर ही दुर्दशा! जिच्या धनसंपत्तीने समुद्रातील गलबतांचे सगळे मालक श्रीमंत झाले ती महान नगरी! तिची एका घटकेत राख झाली! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मोठ्या दुःखाने आपल्या डोक्यात धूळ टाकून ते रडत व आक्रोश करीत म्हणतील: “ ‘हाय, हाय! किती महान नगरी होती ही! ज्या सर्वांकडे जहाजे होती ते तिच्यामुळेच श्रीमंत झाले, आणि आता ती एका तासात उद्ध्वस्त झाली!’ Faic an caibideil |