Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 18:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, सपीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम, व ‘मनुष्यांचे जीव’ हा त्यांचा माल कोणी घेत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 दालचिनी व उटण्याचे मसाले, धूप, सुवासिक तेल व ऊद, द्राक्षरस, तेल, सपीठ आणि गहू आणि जनावरे, मेंढरे, घोडे व रथ आणि दास व मनुष्यांचे जीव, हा त्यांचा माल कोणी विकत घेत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, ऑलिव्ह तेल, पीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम व मानवी जीव हा त्यांचा माल कोणी घेत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तसेच दालचिनी व मसाले, उटणी, धूप, अत्तर, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, उत्तम सपीठ व गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम म्हणून विकण्यात येणारे लोक.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 18:13
25 Iomraidhean Croise  

तिने राजाला एकशेवीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला एवढी सुगंधी द्रव्ये नजर केली की तेवढी पुन्हा कधी कोठून आली नाहीत.


ह्याखेरीज आणखी सौदागर, देवघेव करणारे व्यापारी, निरनिराळ्या लोकांचे राजे व देशांचे सुभेदार ह्यांच्याकडून सोने येई ते निराळेच.


येणारा प्रत्येक जण चांदीची व सोन्याची पात्रे, उंची वस्त्रे, शस्त्रे, सुगंधी द्रव्ये, घोडे व खेचरे ह्यांचा नजराणा वर्षानुवर्ष आणत असे.


त्यांनी त्यांची गुरेढोरे हरण केली; पन्नास हजार उंट, दोन लक्ष पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे एवढी जनावरे व एक लक्ष माणसे त्यांनी नेली.


तिने राजाला एकशे वीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला जी सुगंधी द्रव्ये नजर केली त्यांच्यासारखी पुन्हा कधी कोठून आली नाहीत.


मी त्यांना म्हटले की, “जे आपले यहूदी भाऊबंद परराष्ट्रांस विकले गेले होते त्यांची आम्ही शक्तिनुसार सोडवणूक केली; पण तुम्ही आपल्या भाऊबंदांची विक्री चालवली आहे काय? त्यांना तुम्ही आम्हांला विकणार काय?” हे ऐकून ते स्तब्ध राहिले; त्यांनी चकार शब्दही काढला नाही.


एखाद्या मनुष्याला चोरून नेऊन कोणी त्याला विकील किंवा चोरलेला त्याच्याजवळ सापडेल तर त्याला अवश्य जिवे मारावे.


मी आपली गादी बोळ, अगरू व दालचिनी, ह्यांनी सुवासिक केली आहे.


तुझ्या सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटतो; तुझे नाव सिंचन केलेले सुगंधी अत्तरच होय; म्हणूनच कुमारी तुझ्यावर प्रेम करतात.


गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय?


मी आपल्या वल्लभासाठी दार उघडायला उठले तेव्हा अडसराच्या मुठीवरील गंधरस माझ्या हातांना लागला, माझ्या बोटांवरून त्याचा द्रव थिबकला.


परमेश्वर म्हणतो, “तुमच्या आईला मी सोडून दिल्याचे सूटपत्र कोठे आहे? ज्याला तुम्हांला विकले तो माझा सावकार कोणता? पाहा, तुमच्या दुष्कर्मामुळे तुमची विक्री झाली आहे; तुमच्या अपराधामुळे तुमच्या आईला सोडावे लागले.


यावान, तुबाल व मेशेख हे तुझ्याबरोबर व्यापार करत; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून ते तुला माणसे व पितळेची भांडी देत.


परमेश्वर म्हणतो, “इस्राएलाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण ते रुप्यासाठी नीतिमानास विकतात, एका जोड्यासाठी गरिबास विकतात;


तुम्ही घागरींच्या घागरी द्राक्षारस पिता, उत्तम तेलांनी आपणांस माखता, योसेफावरील आपत्तीबद्दल तुम्ही खेद करत नाही.


म्हणजे आम्ही रुपे देऊन दीनांना विकत घेऊ, एक जोडा देऊन गरिबांना विकत घेऊ व गव्हाचे भूस विकून टाकू.”


आपल्या एखाद्या इस्राएल बांधवाला कोणी चोरले आणि तो त्याला दासाप्रमाणे वागवताना किंवा विकताना आढळला, तर त्या चोराला जिवे मारावे; अशा प्रकारे तू आपल्यामधून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


जो मार्ग पुन्हा तुमच्या दृष्टीस कधी पडणार नाही असे मी म्हणालो होतो त्याच मार्गाने परमेश्वर तुम्हांला जहाजांनी मिसर देशात परत नेईल; तेथे तुम्ही आपल्या शत्रूंचे दास व दासी होण्यासाठी स्वत:ची विक्री करू पाहाल, पण कोणी तुम्हांला विकत घेणार नाही.


जारकर्मी, पुंमैथुनी, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे ह्यांच्यासाठी आणि जे काही सुशिक्षणाविरुद्ध आहे त्यासाठी केलेले आहे;


ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


“ज्या फळफळावळीची तुझ्या जिवाला चटक लागली आहे, ती तुझ्यापासून गेली आहे; आणि मिष्टान्ने व विलासाचे पदार्थ हे सर्व तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत; ते पुढे कोणाला मिळणारच नाहीत!”


तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे ‘व्यापारी रडत व शोक करत’ तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील;


Lean sinn:

Sanasan


Sanasan