Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 17:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्‍चर्य वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्रजनांच्या रक्ताने व येशूसाठी हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 ती स्त्री पवित्र लोकांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मी बघितले की येशूंसाठी हुतात्मे झालेल्या पवित्र लोकांचे रक्त पिऊन ती झिंगली होती. अचंबित होऊन मी तिच्याकडे पाहत राहिलो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 17:6
12 Iomraidhean Croise  

मी पाहिले तो त्या शिंगाने पवित्र जनांबरोबर युद्ध केले, व त्याचे त्यांच्यावर प्राबल्य झाले.


तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांस जेर करील; तो नेमलेल्या सणांत व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहील; एक काळ, दोन काळ व अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कबजात राहतील.


तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लाववत नाही, तो तू ह्या बेइमानी करणार्‍यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून नीतिमान त्याला दुष्ट गिळून टाकतो तेव्हा तू का उगा राहतोस?


“प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो; तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”


तुझा रक्तसाक्षी1 स्तेफन ह्याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवत होतो आणि त्याचा घात करणार्‍याची वस्त्रे सांभाळत होतो.’


त्याला त्यांनी कोकर्‍याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले; आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीती केली नाही.


त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली; ह्यासाठी की, श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि ‘जे कोणी’ त्या श्वापदाच्या ‘मूर्तीला नमन करणार नाहीत’ ते जिवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे.


‘पवित्र जनांबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची’ त्याला मुभा देण्यात आली; आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यांवर त्याला अधिकार देण्यात आला.


कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.”


(तुझी कृत्ये व) तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे, सैतानाचे आसन आहे तेथे; तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस, आणि जेथे सैतान राहतो तेथे माझा रक्तसाक्षी, माझा विश्वासू अंतिपा जो तुमच्यामध्ये जिवे मारला गेला त्याच्या दिवसांतही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan