Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 17:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग मी आत्म्याने संचरित झालो असताना त्याने मला रानात नेले; तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि सात डोकी व ‘दहा शिंगे’ असलेल्या किरमिजी रंगाच्या ‘श्वापदावर’ बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेव्हा दूताने मला पवित्र आत्म्यामध्ये अरण्यात नेले; आणि मला एका किरमिजी रंगाच्या पशूवर बसलेली एक स्त्री दिसली. तो देवनिंदात्मक नावांनी भरलेला होता आणि त्यास सात डोकी व दहा शिंगे होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 मग मी आत्म्याने प्रभावित झालो असताना, त्याने मला रानात नेले, तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि सात डोकी व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 नंतर मी आत्म्याने संचरित असताना देवदूताने मला रानात नेले. तिथे किरमिजी रंगाचे श्वापद व त्यावर परमेश्वर निंदात्मक नावे असून त्याला सात डोकी व दहा शिंगे होती व एक स्त्री त्यावर बसलेली मला दिसली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 17:3
26 Iomraidhean Croise  

मी आपल्याकडून जाताच मला कळणार नाही अशा ठिकाणी परमेश्वराचा आत्मा आपणाला घेऊन जाईल; आणि मी जाऊन अहाबाला हे वर्तमान सांगितले व आपण त्याला आढळला नाहीत तर तो मला मारून टाकील. मी आपला दास तर बाळपणापासून परमेश्वराला भिऊन वागत आलो आहे.


ते त्याला म्हणाले, “ऐका, आपल्या सेवकांजवळ पन्नास बळकट पुरुष आहेत; त्यांना आपल्या स्वामीचा शोध करण्यास जाऊ द्या; परमेश्वराच्या आत्म्याने त्याला उचलून एखाद्या पर्वतावर अथवा एखाद्या खोर्‍यात टाकले असेल.” तो म्हणाला, “कोणालाही पाठवू नका.”


आपल्या वल्लभावर ओठंगून रानातून येत आहे ही कोण? सफरचंदाच्या झाडाखाली मी तुझे प्रेम जागृत केले; तेथे तुझी माता तुला प्रसवली; तुझ्या जननीला तेथे प्रसववेदना झाल्या.


तेव्हा त्या आत्म्याने दृष्टान्तात मला उचलून घेऊन खास्दी देशात धरून आणलेल्या लोकांकडे आणले आणि जो दृष्टान्त मी पाहत होतो तो माझ्या डोळ्यांआड झाला.


तेव्हा आत्म्याने मला उचलून धरले आणि माझ्यामागून त्याच्या स्थानातून, परमेश्वराच्या वैभवाचा धन्यवाद असो, असा प्रचंड वेगाचा शब्द झालेला मी ऐकला.


त्याने हाताच्या आकृतीचे काही पुढे करून माझ्या डोक्यावरील एक बट धरली आणि आत्म्याने आकाश व पृथ्वी ह्यांच्या दरम्यान मला उचलून नेऊन दिव्यदृष्टीने यरुशलेम येथे उत्तरेस असलेल्या आतल्या अंगणाच्या दरवाजाजवळ आणले; तेथे ईर्ष्येस पेटवणार्‍या मूर्तीचे आसन होते.


तो राजा मनास येईल तसे वर्तेल; तो उन्मत्त होईल; सर्व दैवतांहून तो स्वतःला श्रेष्ठ समजेल आणि देवाधिदेवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल; कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती राहील; जे नेमले आहे ते घडेलच.


त्याच्या डोक्याला दहा शिंगे असून आणखी एक शिंग निघाले त्यामुळे तीन शिंगे उपटून पडली; ह्या शिंगाला डोळे व मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड असून ते आपल्याबरोबरच्या इतर शिंगांहून लठ्ठ दिसत होते; ह्या सगळ्यांचे मर्म काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली.


तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांस जेर करील; तो नेमलेल्या सणांत व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहील; एक काळ, दोन काळ व अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कबजात राहतील.


मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता, पाहा, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले; त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगांपैकी तीन समूळ उपटली गेली; आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते.


त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला;


मग ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिप्पाला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंढाच्या दृष्टीस पडला नाही; नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करत चालला.


तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वत:ला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वत:चे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.


प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्यामागे कर्ण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली.


त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते; तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक ‘काळ, दोन काळ व अर्धकाळ’ तिचे पोषण व्हायचे होते.


स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले ते हे : पाहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला सात डोकी व ‘दहा शिंगे’ होती, आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते.


ती स्त्री रानात पळून गेली; तेथे तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे.


जी स्त्री तू पाहिलीस ती ‘पृथ्वीवरच्या राजांवर’ राज्य करणारी मोठी नगरी होय.”


ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्याली होती; आणि सोने, मूल्यवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्माच्या मळाने भरलेला ‘सोन्याचा प्याला’ होता;


सोने, रुपे, मोलवान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, जांभळ्या रंगाचे कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगाचे कापड, सर्व प्रकारची सुगंधी लाकडे, सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, सर्व प्रकारची अति मोलवान लाकडाची, पितळेची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे;


आणि म्हणतील, “अरेरे! पाहा, ही मोठी नगरी! तागाची बारीक वस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली, सोने, मोलवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली नगरी!


तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने ‘मला’ मोठ्या ‘उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम’ देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली.


लगेचच मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते, आणि ‘त्या राजासनावर कोणीएक बसलेला होता.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan