Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 17:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आणखी तो मला म्हणाला, “जेथे कलावंतीण बसली आहे, तेथे ‘जे जलप्रवाह’ तू पाहिलेस, ते लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 आणि तो मला म्हणतो, तू जे पाण्याचे प्रवाह बघत आहेस, ज्यांवर ती वेश्या बसली आहे, ते निरनिराळे समाज, समुदाय आणि राष्ट्रे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 तो देवदूत मला आणखी म्हणाला, “जेथे वेश्या बसली आहे, तेथे जे जलप्रवाह तू पाहिलेस ते लोक, समुदाय, राष्ट्रे व भाषा बोलणारे असे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तेव्हा देवदूत मला म्हणाला, “ती वेश्या ज्यांच्यावर बसली आहे, ते जलप्रवाह म्हणजे प्रत्येक लोक, समुदाय, राष्ट्र व भाषा आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 17:15
14 Iomraidhean Croise  

मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले.


तू समुद्रांची गर्जना, त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवतोस;


“परमेश्वर म्हणतो, पाहा, उत्तरेकडून पाणी चढत आहे, त्याचा मोठा लोंढा बनत आहे; देश व त्यातील सर्वकाही, नगर व त्यातले रहिवासी ह्या सर्वांना तो तुडवील; लोक आक्रोश करतील, देशातले सर्व रहिवासी हायहाय करतील.


हे बहुत जलप्रवाहाजवळ राहणार्‍या, समृद्ध भांडारे असलेल्या, तुझा अंतसमय आला आहे, तुझ्या मिळकतीस आळा बसला आहे.


समुद्र बाबेलवर लोटला आहे; त्याच्या लाटांच्या समुदायाने तो झाकून गेला आहे.


कारण परमेश्वर बाबेलास उजाड करीत आहे, त्याच्यातला कलकलाट नाहीसा करीत आहे; त्यांच्या शब्दलहरींचा ध्वनी महासागराच्या गर्जनेसारखा आहे; त्यांच्या गोंगाटाचा ध्वनी होत आहे;


पाण्याने त्याला पोसले, जलाशयाने त्याला वाढवले, त्यातून निघणारे प्रवाह लागवड केलेल्या सर्व मळ्यांत खेळत असत आणि त्याचे पाट वनातल्या सर्व झाडांना जाऊन पोहचत असत.


तेव्हा ते मला म्हणाले, “अनेक ‘लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे ह्यांच्याविषयी तू’ पुन्हा ‘संदेश दिला पाहिजेस.”’


लोक, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यांतील लोक ती त्यांची प्रेते साडेतीन दिवस पाहतील आणि ती कबरांत ठेवू देणार नाहीत.


नंतर सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकी एक जण येऊन माझ्याबरोबर बोलू लागला; तो म्हणाला, “इकडे ये, म्हणजे ‘अनेक जलप्रवाहांवर’ बसलेल्या मोठ्या कलावंतिणीचा2 झालेला न्यायनिवाडा तुला दाखवतो;


ते ‘नवे गीत गाऊन’ म्हणतात : “तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस; कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून 1आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत


Lean sinn:

Sanasan


Sanasan