Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 16:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली; आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि त्यास लोकांस अग्नीने जाळून टाकण्याची परवानगी देण्यात आली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 त्यानंतर चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपून टाकण्याची मुभा देण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मग चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सर्व माणसांना सूर्याच्या अग्नीने भाजून काढण्याची परवानगी देण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 16:8
11 Iomraidhean Croise  

चंद्र तांबूस होईल, सूर्य फिक्का पडेल; कारण सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत आपल्या प्रजेतील वडिलांसमोर वैभवाने राज्य करील.


मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळईचा वारा वाहवला, तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले; त्याने तो मूर्च्छित झाला व आपणाला मृत्यू येवो, अशी विनवणी करून तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते!”


आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले.


तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्यांत चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवर ‘समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे’ घाबरी होऊन पेचात पडतील;


परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल;


ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदीतून निघाला; त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले, “तू आपला तीक्ष्ण धारेचा ‘विळा चालवून’ पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे; तिची द्राक्षे पिकली आहेत.”


त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला; ‘सूर्य’ केसांपासून बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा ‘चंद्र रक्ता’सारखा झाला;


ते ह्यापुढे ‘भुकेले असे होणार नाहीत, व तान्हेलेही होणार नाहीत; त्यांना सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही.’


चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व तार्‍यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले.


त्याने अथांग डोह उघडला, ‘तेव्हा’ त्यातून मोठ्या ‘भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला;’ आणि त्या डोहातल्या धुराने ‘सूर्य’ व अंतराळ हे ‘अंधकारमय’ झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan