Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 16:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 सुमारे एक मण वजनाच्या ‘मोठ्या गारा’ आकाशातून माणसांवर पडल्या; तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्या गारांची पीडा ‘अतिभयंकर’ होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 आणि एक मण वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून खाली लोकांवर पडल्या; आणि त्या गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्यांची पीडा फार मोठी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 प्रत्येकी सुमारे पन्नास किलो वजनाच्या प्रचंड गारा आकाशातून माणसांवर पडल्या. गारांच्या विपत्तीमुळे लोकांनी देवाला शिव्याशाप दिले, कारण त्या गारांची विपत्ती अतिभयंकर होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 प्रत्येकी सुमारे पन्नास कि.ग्रॅ. वजनाच्या प्रचंड गारा आकाशातून माणसांवर पडल्या. गारांच्या पीडांमुळे लोकांनी परमेश्वराला शाप दिले, कारण त्या गारांची पीडा फार भयानक होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 16:21
15 Iomraidhean Croise  

तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेस काय? तू गारांची भांडारे पाहिली आहेत काय?


ती मी संकटसमयासाठी, लढाई व युद्ध ह्यांच्या प्रसंगासाठी राखून ठेवली आहेत.


पाहा, उद्या ह्या वेळेस मी गारांची अशी भयंकर वृष्टी करीन की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टी झाली नाही.


मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आपला हात आकाशाकडे उगार म्हणजे सर्व मिसर देशावर गारांची वृष्टी होईल; मिसर देशातील माणसांवर, गुरांवर व शेतातील प्रत्येक वनस्पतीवर ती होईल.”


तेव्हा परमेश्वर आपला प्रतापी शब्द कानी पाडील, आणि आपल्या क्रोधाचे फुरफुरणे, भस्म करणार्‍या अग्नीची ज्वाला, मेघांचा गडगडाट आणि पर्जन्य व गारा ह्यांची वृष्टी ह्यांनी आपले भुजबल दाखवील.


ते कष्टी व क्षुधित होऊन देशात भटकतील; आणि असे होईल की त्यांना भूक लागली म्हणजे ते संतापून आपल्या राजाला व आपल्या देवाला शिव्याशाप देतील; मग आपली तोंडे ते वर करतील;


त्या कच्चा चुना लिंपणार्‍यांना म्हण, तट पडेल! जोराचा पाऊस लागेल; अहो मोठ्या गारांनो, तुम्ही पडाल; तुफानी वारा सुटेल;


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो : आपल्या संतापामुळे तुफानी वारा सुटेल असे मी करीन; माझ्या कोपामुळे जोराचा पाऊस पडेल, नाश होण्यासाठी माझ्या संतापामुळे मोठ्या गारा पडतील.


ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळे ते ठार झाले; इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांनी मेले.


तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले, ‘त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश’ दृष्टीस पडला आणि ‘विजा’ चमकल्या, ‘गर्जना’ व मेघांचे गडगडाट झाले, भूमिकंप झाला व ‘मोठ्या गारांची वृष्टीही’ झाली.


आणि आपल्या वेदनांमुळे व आपल्या फोडांमुळे त्यांनी ‘स्वर्गाच्या’ देवाची निंदा केली, आणि आपल्या कृत्यांबद्दल पश्‍चात्ताप केला नाही.


माणसे कडक उन्हाने करपून गेली; तेव्हा त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही.


पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा ‘रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर’ वृष्टी झाली; आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला; एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan