Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 16:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आणि आपल्या वेदनांमुळे व आपल्या फोडांमुळे त्यांनी ‘स्वर्गाच्या’ देवाची निंदा केली, आणि आपल्या कृत्यांबद्दल पश्‍चात्ताप केला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्यांनी आपल्या क्लेशांमुळे आणि आपल्या फोडांमुळे स्वर्गीय देवाची निंदा केली आणि आपल्या कृतींचा पश्चात्ताप केला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 त्यांच्या वेदनांमुळे व फोडांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली परंतु आपल्या कृत्यांबद्दल पश्चात्ताप केला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आपल्या वेदना आणि फोड याबद्दल त्यांनी स्वर्गातील परमेश्वराला शाप दिले. पण आपल्या दुष्कृत्यांबद्दल पश्चात्ताप करण्याचे त्यांनी नाकारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 16:11
20 Iomraidhean Croise  

संकटसमयी ह्या आहाज राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला.


“पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गीचा देव परमेश्वर ह्याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत व मला आज्ञा केली आहे की यहूदातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध. तर तुमच्यापैकी त्याच्या सर्व लोकांतील जो कोणी असेल त्याच्याबरोबर त्याचा देव परमेश्वर असो. त्याने तेथे जावे.”


“पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गींचा देव परमेश्वर ह्याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहूदा प्रांतातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध;


म्हणजे ते स्वर्गीच्या देवास हव्य म्हणून होमबली अर्पण करतील आणि राजा व त्याचे पुत्र दीर्घायू व्हावेत अशी प्रार्थना करतील.


“स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री एज्रा याजक ह्याला राजाधिराज अर्तहशश्त इत्यादी;


मी अर्तहशश्त राजा महानदाच्या पश्‍चिमेकडील सर्व भांडार्‍यांस अशी आज्ञा करीत आहे की, एज्रा याजक जो स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत आहे तो जे काही तुमच्याकडे मागेल ते सर्व ताबडतोब त्याला द्यावे;


जी काही आज्ञा स्वर्गीचा देव करील तिच्यानुसार स्वर्गीच्या देवाच्या मंदिरासाठी करण्यात यावे; राजा व त्याचे पुत्र ह्यांच्या राज्यावर त्याचा रोष होईल असे का होऊ द्यावे?


हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो; मी उपास करून स्वर्गींच्या देवाची प्रार्थना केली की,


राजाने मला विचारले, “तुझी विनंती काय आहे?” तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली,


स्वर्गातील देवाचे उपकारस्मरण करा; कारण त्याची दया सनातन आहे.


त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसर्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते ह्या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांना नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.


तो त्यांना म्हणाला, “मी इब्री आहे; ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे.”


आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसर्‍यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.


त्याच घटकेस ‘मोठा भूमिकंप’ झाला. तेव्हा त्या नगराचा दहावा भाग ‘पडला,’ भूमिकंपाने सात हजार माणसे ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी ‘स्वर्गीय देवाचा’ गौरव केला.


तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या ‘लोकांना’ वाईट व ‘घाणेरडे फोड आले.’


सुमारे एक मण वजनाच्या ‘मोठ्या गारा’ आकाशातून माणसांवर पडल्या; तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्या गारांची पीडा ‘अतिभयंकर’ होती.


माणसे कडक उन्हाने करपून गेली; तेव्हा त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही.


तिने पश्‍चात्ताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्‍चात्ताप करण्याची तिची इच्छा नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan