Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ते राजासनासमोर आणि चार प्राणी व वडील ह्यांच्यासमोर जसे काय ‘एक नवे गीत गात होते;’ ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक ह्यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ते राजासनासमोर आणि त्या चार प्राणी व वडिलांसमोर जणू एक नवे गीत गात होते; पृथ्वीवरून विकत घेतलेले जे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे होते त्यांच्याशिवाय कोणीही मनुष्य ते गीत शिकू शकला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 ते एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक राजासन, चार प्राणी व वडीलजन ह्यांच्यासमोर एक नवे गीत गात होते. ते गीत ह्यांच्याशिवाय कोणीही शिकू शकले नाहीत. पृथ्वीवरील सर्व लोकांपैकी ह्यांचेच तारण झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 लोकांचा हा अतिभव्य गायकवृंद परमेश्वराचे राजासन, चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांच्यासमोर एक नवे गीत गात होता. पृथ्वीवरून खंडणी भरून सोडविलेल्या या 1,44,000 लोकांशिवाय दुसर्‍या कोणालाही हे गाणे शिकता येत नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 14:3
17 Iomraidhean Croise  

हे देवा, मी तुला नवे गीत गाईन; दशतंतू वीणेवर मी तुझे स्तोत्र गाईन;


परमेशाचे स्तवन करा!1 नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा.


परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणार्‍यांबरोबर असते; तो आपला करार त्यांना कळवील.


त्याच्यापुढे नवे गीत गा; जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा;


त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले; हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील.


परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.


परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधला आहे.


अहो समुद्रावर पर्यटन करणारे व त्यात राहणारे सर्व लोकहो, अहो द्वीपांनो, तुम्ही आपल्या रहिवाशांसह परमेश्वराला नवगीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तोत्रे गा.


कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे.


स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते.


नंतर मी पाहिले, तो पाहा, कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव ‘कपाळावर’ लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते;


‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्‍याचे गीत’ गाताना म्हणतात, “हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत;’ ‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’


आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त ‘राखलेल्या मान्न्यातून मी देईन’ आणि त्याला मी पांढरा खडा देईन; त्या खड्यावर ‘नवे नाव’ लिहिलेले असेल, ते तो खडा घेणार्‍याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही.


ते ‘नवे गीत गाऊन’ म्हणतात : “तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस; कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून 1आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत


ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan