Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 14:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 ‘ते द्राक्षकुंड’ नगराबाहेर ‘तुडवले गेले;’ त्यातून रक्त वाहिले, त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामांना पोहचेल इतका असून तो शंभर कोसपर्यंत वाहत गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 यानंतर ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले; व द्राक्षकुंडामधून रक्त वर आले; ते घोड्याच्या लगामापर्यंत चढले आणि शंभर कोसांच्या परिसरात पसरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडविले गेले, त्यातून रक्त वाहू लागले, त्याचा प्रवाह सुमारे दोन मीटर खोल असून तो सुमारे तीनशे किलोमिटर वाहत गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 ते द्राक्षकुंड शहराबाहेर तुडविण्यात आले, तेव्हा त्यातून रक्ताचा पाट वाहिला. हा पाट घोड्यांच्या लगामा एवढा उंच आणि तीनशे किलोमीटर लांब होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 14:20
12 Iomraidhean Croise  

तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला, आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील; तो आपले वस्त्र द्राक्षारसात, आपला पोशाख द्राक्षांच्या रक्तात धुईल.


ज्या माणसांनी माझ्याविरुद्ध बंड केले त्यांची प्रेते ते बाहेर जाऊन पाहतील; कारण त्यांना लागलेली कीड कधी मरायची नाही; त्यांना लागलेला अग्नी कधी विझायचा नाही; सर्व मानवजातीस त्यांची किळस येईल.”


प्रभूने माझ्यामधले माझे सर्व वीर तुच्छ केले आहेत; माझ्या तरुणांना चिरडून टाकावे म्हणून त्याने माझ्याविरुद्ध प्रचंड समुदाय बोलावला आहे; यहूदाच्या कुवार कन्येला प्रभूने द्राक्षकुंडात तुडवले आहे.


तुझ्या रक्तप्रवाहाने देश बुडवून टाकीन, तो पर्वताला जाऊन लागेल, सर्व नदीनाले तुझ्या रक्ताने भरतील.


विळा चालवा, पीक तयार आहे; या, चला, उतरा, द्राक्षांचा घाणा भरला आहे; कुंडे भरून वाहत आहेत; कारण लोकांची दुष्टाई फार आहे.


गाईचे दही, मेंढ्यांचे दूध, कोकरांची चरबी, बाशानाचे एडके व बकरे, उत्तम गव्हाचे सत्त्व, हे त्याला दिले; द्राक्षांची लालभडक मदिरा तू प्यालास.


आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर, आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळण्यात आले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan