Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 14:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 नंतर ‘मी पाहिले, तेव्हा’ पांढरा मेघ व त्या ‘मेघावर’ बसलेला ‘मनुष्याच्या पुत्रासारखा’ कोणीएक ‘दृष्टीस पडला;’ त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हातात तीक्ष्ण धारेचा विळा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तेव्हा मी बघितले आणि पाहा, एक पांढरा ढग आणि मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी त्या ढगावर बसला होता. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट आणि त्याच्या हातात एक धारदार विळा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 नंतर मी पाहिले तेव्हा पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मग मी पाहिले तो मला एक पांढरा मेघ दिसला, त्या मेघावर मनुष्याच्या पुत्रासारखे कोणी एक बसले होते. त्यांच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व हातात धारदार विळा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 14:14
19 Iomraidhean Croise  

कल्याणदायी वरदाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस. तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालतोस.


ढग व अंधार त्याच्याभोवती आहेत; नीती व न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.


मिसर देशाविषयीची देववाणी; परमेश्वर शीघ्रगती मेघावर आरूढ होऊन मिसराकडे येत आहे; मिसरातील मूर्ती त्याच्यासमोर कापत आहेत आणि मिसराचे हृदय आतल्या आत विरघळत आहे.


त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यावर नीलमण्याच्या सिंहासनासारखे काही दिसत होते आणि त्या सिंहासनावर पुरुष असल्याचा भास होत होता.


तेव्हा मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तर आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला; तो त्या पुराणपुरुषाकडे आला व त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले.


कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणार्‍यांना सांगेन की, आधी निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.”’


तो बोलत आहे इतक्यात, पाहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली; आणि पाहा, मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे;’ ह्याचे तुम्ही ऐका.”


पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे.”


आणि तेव्हा ‘मनुष्याचा पुत्र’ पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ‘मेघात येताना’ लोकांच्या दृष्टीस पडेल.


देवाच्या कृपेने प्रत्येकाकरता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला ‘देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले होते,’ तो येशू मरण सोसल्यामुळे ‘गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केलेला’ असा आपण पाहतो.


आणि त्या समयांच्या मध्यभागी ‘मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ वस्त्र परिधान केलेला,’ आणि छातीवरून ‘सोन्याचा’ ‘पट्टा बांधलेला’ असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला;


‘पाहा, तो मेघांसहित येतो;’ प्रत्येक डोळा त्याला ‘पाहील’, ज्यांनी त्याला ‘भोसकले तेही पाहतील; आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील.’ असेच होणार. आमेन.


मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला; तो मेघवेष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे, व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते.


“हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था; जो तू आहेस व होतास [व येणार], तो तू, आपले महान सामर्थ्य धारण केले आहेस आणि ‘राज्यारूढ झाला आहेस’ म्हणून आम्ही तुझे आभार मानतो.


‘त्याचे डोळे अग्नीच्या’ ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते; त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे; ते त्याच्यावाचून कुणालाही कळत नाही.


‘नंतर’ मोठे पांढरे ‘राजासन’ व त्यावर ‘बसलेला’ एक जण ‘माझ्या दृष्टीस पडला;’ त्याच्या ‘तोंडापुढून पृथ्वी’ व आकाश हे ‘पळाले; त्यांकरता ठिकाण उरले नाही.’


मग मी पाहिले तो एक ‘पांढरा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुकुट देण्यात आला; तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan