Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 13:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याला ‘मोठमोठ्या’ देवनिंदात्मक ‘गोष्टी बोलणारे तोंड’ देण्यात आले, व बेचाळीस महिने त्याला आपले ‘काम चालवण्याची’ मुभा देण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आणि, त्या पशूला मोठ्या गर्विष्ठ गोष्टी व अपमानास्पद शब्द बोलणारे तोंड दिले होते; आणि त्यास हे करायला बेचाळीस महिने अधिकार दिला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 देवनिंदा करणारे अहंकारयुक्त दावे करण्याची त्याला मुभा देण्यात आली होती आणि बेचाळीस महिने त्याला अधिकार देण्यात आला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्या पशूला गर्विष्ठ उद्गार काढणारे, दुर्भाषणे करणारे तोंड देण्यात आले होते. तसेच बेचाळीस महिने आपला अधिकार गाजविण्याचे त्याला स्वातंत्र्य देण्यात आले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 13:5
17 Iomraidhean Croise  

खुशामत करणारे सर्व ओठ, फुशारकी मारणारी जीभ परमेश्वर कापून टाको.


ह्या प्रकारे तुम्ही आपल्या तोंडाने माझ्याविरुद्ध आपली थोरवी मिरवलीत, माझ्याविरुद्ध हवे तितके बोललात; ते मी ऐकले आहे.


तो राजा मनास येईल तसे वर्तेल; तो उन्मत्त होईल; सर्व दैवतांहून तो स्वतःला श्रेष्ठ समजेल आणि देवाधिदेवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल; कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती राहील; जे नेमले आहे ते घडेलच.


जो धीर धरून तेराशे पस्तीस दिवसांची अखेर पाहील तो धन्य.


त्या वेळी त्या शिंगांतून निघालेला मोठा शब्द ऐकून मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला; त्याचे शरीर छिन्नभिन्न करण्यात आले; व ते जळावे म्हणून अग्नीत टाकण्यात आले; एवढे मी पाहिले.


त्याच्या डोक्याला दहा शिंगे असून आणखी एक शिंग निघाले त्यामुळे तीन शिंगे उपटून पडली; ह्या शिंगाला डोळे व मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड असून ते आपल्याबरोबरच्या इतर शिंगांहून लठ्ठ दिसत होते; ह्या सगळ्यांचे मर्म काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली.


तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांस जेर करील; तो नेमलेल्या सणांत व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करण्यास पाहील; एक काळ, दोन काळ व अर्धा काळपर्यंत ते त्याच्या कबजात राहतील.


मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता, पाहा, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले; त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगांपैकी तीन समूळ उपटली गेली; आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यांसारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते.


तो मला म्हणाला, “दोन हजार तीनशे दिवस;1 त्यानंतर पवित्रस्थानाची शुद्धी होईल.”


कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पापपुरुष प्रकट होईल.


तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वत:ला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वत:चे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.


मग तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू ‘आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील’, आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील.


त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर ‘अथांग डोहातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील’ आणि ‘त्यांना जिंकून’ जिवे मारील;


त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते; तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक ‘काळ, दोन काळ व अर्धकाळ’ तिचे पोषण व्हायचे होते.


ती स्त्री रानात पळून गेली; तेथे तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे.


‘पवित्र जनांबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची’ त्याला मुभा देण्यात आली; आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यांवर त्याला अधिकार देण्यात आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan