Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 13:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 जी चिन्हे त्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून ते पृथ्वीवर राहणार्‍यांना ठकवते; म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही, जिवंत राहिलेल्या श्वापदासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणार्‍यांना ते सांगते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आणि त्यास त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणाऱ्यांना फसवतो आणि ज्या पशूला तलवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणाऱ्यांस सांगतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 जी चिन्हे त्या पहिल्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून त्याने पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवले, म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदाची मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना त्याने फसवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 कारण पहिल्या पशूच्या प्रतिनिधी प्रमाणे या पशूने अद्भुत चिन्हे करून पृथ्वीवरील रहिवाशांना फसविले. तलवारीने प्राणांतिक जखम होऊनही पुन्हा जिवंत झालेल्या त्या पहिल्या पशूची मोठी मूर्ती उभारावी, असा त्याने जगातील लोकांना हुकूम केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 13:14
29 Iomraidhean Croise  

यशयाने सांगितले, “अंजिराची एक चांदकी आणा.” ती त्यांनी आणून गळवावर बांधली व त्याला गुण आला.


तर पाहा, मी असे करीन की तुला तुझ्या पितरांशी मिळवीन; तुला तुझ्या कबरेत सुरक्षितपणे पोचवतील; जो गहजब मी ह्या स्थलावर आणणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस.”’ त्यांनी परत येऊन राजाला हे कळवले.


परमेश्वराने विचारले, ‘कसा?’ तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा होईन.’ परमेश्वर म्हणाला, ‘तू त्याला मोह घालशील, जा तुझ्याकडून हे होईल; तसेच कर,’


सामर्थ्य व चातुर्य ही त्याला आहेत; भ्रांत होणारा व भ्रांत करणारा हे त्याच्या सत्तेत आहेत.


मग फारोनेही जाणते व मांत्रिक बोलावले; मिसराच्या त्या जादुगारांनीसुद्धा आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला.


तो राख भक्षण करतो, त्याचे हृदय मूढ झाल्यामुळे तो बहकला आहे; तो आपला जीव वाचवू शकत नाही; “माझ्या उजव्या हातात आहे ती साक्षात लबाडी नव्हे काय?” असे तो म्हणत नाही.


जर कोणी संदेष्टा भ्रमात पडून संदेश देत असला तर समजावे की मीच त्याला भ्रमात पाडले आहे; मी आपला हात त्याच्यावर उगारीन व माझे लोक जे इस्राएल त्यांतून त्याचा उच्छेद करीन.


मी दिलेल्या सोन्यारुप्याचे शोभिवंत दागिने घेऊन तू त्यांच्या पुरुषमूर्ती केल्यास व त्यांच्याबरोबर शिंदळकी केलीस;


मी आत जाऊन पाहिले तर सरपटणारे प्राणी, अमंगळ पशू व इस्राएल घराण्याच्या सर्व मूर्ती ह्यांची चित्रे भिंतींवर चोहोकडे काढलेली होती.


तो राजा मनास येईल तसे वर्तेल; तो उन्मत्त होईल; सर्व दैवतांहून तो स्वतःला श्रेष्ठ समजेल आणि देवाधिदेवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल; कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती राहील; जे नेमले आहे ते घडेलच.


तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वत:ला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वत:चे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.


मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल1 व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.


नंतर मी एक ‘श्वापद समुद्रातून वर येताना’ पाहिले; त्याला ‘दहा शिंगे’ व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती.


त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली; ह्यासाठी की, श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि ‘जे कोणी’ त्या श्वापदाच्या ‘मूर्तीला नमन करणार नाहीत’ ते जिवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे.


‘ज्या कोणाची’ नावे जगाच्या स्थापनेपासून ‘वधलेल्या कोकर्‍याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील.


त्यांच्या पीडेचा ‘धूर युगानुयुग वर येतो;’ आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यांना, आणि जो कोणी त्याच्या नावाची खूण धारण करून घेतो त्याला ‘रात्रंदिवस’ विश्रांती मिळत नाही.”


त्यांच्यामागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, “जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो, आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो,


मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले; श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळवलेले लोक हातांत देवाच्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले.


नंतर ‘बेडकासारखे’ असलेले तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून निघताना मी पाहिले.


तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या ‘लोकांना’ वाईट व ‘घाणेरडे फोड आले.’


‘दिव्याचा उजेड’ तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही; ‘आणि नवरानवरीचा शब्द’ तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणारच नाही; तुझे ‘व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक’ होते; आणि सर्व राष्ट्रे ‘तुझ्या चेटकाने’ ठकवली गेली.


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, ‘तुमची परीक्षा व्हावी’ म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे; आणि तुमचे ‘दहा दिवस’ हालअपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.


त्यांना ठकवणार्‍या सैतानाला ‘अग्नीच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; त्यात ते श्वापद व खोटा संदेष्टा आहे; तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.


धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan