Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 13:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ते मोठी चिन्हे करते; माणसांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असेदेखील करते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तो मोठी चिन्हे करतो; लोकांच्या दृष्टीपुढे आकाशातून पृथ्वीवर अग्नी उतरेल असे तो करतो,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 ह्या दुसऱ्या श्वापदाने मोठेमोठे चमत्कार केले. माणसांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असेदेखील त्याने केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्याने महान चमत्कार केले, सर्वांच्या डोळ्यांदेखत आकाशातून पृथ्वीवर अग्निज्वाला आणल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 13:13
20 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटले.


तेव्हा मिसराच्या जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन ह्यांचे म्हणणे ऐकेना.


तेव्हा जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले, त्यांनी मिसर देशावर बेडूक आणले.


गळवांमुळे जादुगारांना मोशेपुढे उभे राहवेना कारण जादुगार आणि सर्व मिसरी लोक ह्यांना गळवे आली होती.


मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणार्‍या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.


तेव्हा परूशी व सदूकी ह्यांनी येऊन येशूची परीक्षा पाहण्याकरता, ‘आम्हांला आकाशातून काही चिन्ह दाखवा,’ अशी त्याच्याकडे मागणी केली.


कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’


कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उपस्थित होतील, आणि साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’


यान्नेस व यांब्रेस ह्यांनी जसे मोशेला अडवले, तसे हेही सत्याला अडवतात; हे लोक भ्रष्टबुद्धी बनलेले व विश्वासासंबंधाने पसंतीस न उतरलेले असे आहेत,


त्यांना कोणी उपद्रव करू पाहिल्यास ‘त्यांच्या तोंडांतून अग्नी निघून त्यांच्या वैर्‍यांना खाऊन टाकतो;’ कोणी त्यांना उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला ह्याचप्रमाणे जिवे मारण्यात यावे.


ते चिन्हे दाखवणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात.


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


त्यांनी ‘पृथ्वीच्या विस्तारावर’ फिरून पवित्र जनांची छावणी व ‘प्रिय’ नगर वेढले; ‘तेव्हा [देवापासून] स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने’ त्यांना ‘खाऊन टाकले.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan