Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 11:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ‘राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली,’ तुझ्या ‘क्रोधाची’ वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि ‘तुझे दास संदेष्टे’ व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासाडी करणार्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 राष्ट्रे रागावली आहेत परंतु तुझा क्रोधाग्नी आला आहे आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्याची वेळ आली आहे आणि तू आपल्या दासांना, तुझ्या संदेष्ट्यांना, पवित्रजनांना आणि जे तुझ्या नावाचे भय धरतात अशा लहानथोरांना वेतन देण्याची वेळ आली आहे. आणि ज्यांनी पृथ्वीचा नाश केला त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली आहेत, कारण तुझ्या क्रोधाची वेळ आली आहे. मृतांचा न्याय करण्याची वेळ आणि तुझे दास, संदेष्टे, तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ आणि पृथ्वीचा नाश करण्याऱ्यांचा विध्वंस करण्याची वेळ आली आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 राष्ट्रे तुमच्यावर क्रोधाविष्ट झाली होती; पण आता तुमचा क्रोध प्रगट झाला आहे. आता मृतांचा न्याय करण्याची वेळ आली आहे, तुमचे सेवक संदेष्टे, तुमचे पवित्रजन आणि तुमच्या नावाचा आदर करणारे सर्व लहान व थोर— अशा सर्वांना पारितोषिके देण्याची, व पृथ्वीचा नाश करणार्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 11:18
48 Iomraidhean Croise  

कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्यांचे भय धरणार्‍यांवर विपुल आहे.


तुझ्या उजव्या हाताकडे असलेला प्रभू आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा बिमोड करील;


जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो.


पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांना घाबरे करील.


खरोखर त्याचे भय धरणार्‍यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते; ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे.


आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.


पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खातरी आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्याला भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल;


पण पूर्वेकडल्या व उत्तरेकडल्या बातम्यांनी तो चिंताक्रांत होईल; तेव्हा मोठ्या संतापाने पुष्कळांचा नाश व उच्छेद करण्यास तो निघून जाईल.


पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करतील व त्याचा कायमचा नायनाट करतील.


तो आपल्या काव्याने आपल्या हातची कारस्थाने सिद्धीस नेईल; तो उन्मत्त होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करील; तथापि त्याच्यावर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल.


आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.


आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’


ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,


तर सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसांत म्हणजे तो देवदूत कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल, तेव्हा देवाने ‘आपले दास संदेष्टे’ ह्यांना जाहीर केल्यानुसार ‘त्याचे गूज’ पूर्ण होईल.


तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस; कारण ते ‘परराष्ट्रीयांना दिले’ आहे; आणि ते बेचाळीस महिने पवित्र नगरी ‘तुडवतील.’


जो ‘कैदेत जायचा तो कैदेत’ जातो; ‘जो तलवारीने’ जिवे मारील, त्याला ‘तलवारीने’ मरणे भाग आहे. ह्यावरून पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो.


लहानथोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास, ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी;


तोही ‘देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला’ त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल, आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकर्‍यासमक्ष त्याला ‘अग्नी व गंधक’ ह्यांपासून पीडा होईल.


नंतर मी अत्यंत आश्‍चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले; ‘सात पीडा’ घेतलेले सात देवदूत दृष्टीस पडले; त्या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला.


त्या चार प्राण्यांपैकी एकाने युगानुयुग जिवंत असणार्‍या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या सात वाट्या त्या सात देवदूतांना दिल्या.


‘जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे’ तिला दुप्पट द्या; तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी त्यात ओता.


त्याने ‘राष्ट्रांना मारावे’ म्हणून त्याच्या ‘तोंडातून तीक्ष्ण धारेची’ तलवार निघते; तो ‘त्यांच्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील’; आणि सर्वसमर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे ‘कुंड तो तुडवतो.’


राजाचे’ मांस, सरदारांचे मांस, ‘बलवानांचे मांस, घोड्यांचे’ व त्यांवरील स्वारांचे मांस, आणि स्वतंत्र व दास, लहानमोठे, अशा सर्वांचे मांस ‘खाण्यास’ या.”


इतक्यात ‘राजासनापासून’ वाणी झाली; ती म्हणाली, “अहो आमच्या देवाची ‘भीती बाळगणार्‍या सर्व लहानथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”’


मग मृत झालेल्या लहानथोरांना मी [देवाच्या] राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी ‘पुस्तके उघडली गेली;’ तेव्हा दुसरे एक ‘पुस्तक’ उघडले गेले ते ‘जीवनाचे’ होते; आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ‘ज्यांच्या-त्यांच्या कृत्यांप्रमाणे’ ठरवण्यात आला.


ज्या कोणाचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही’ तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला.


“‘पाहा, मी’ लवकर1 ‘येतो;’ आणि प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan