Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 10:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले’, आणखी अवकाश लागणार नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यामध्ये जे आहेत, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते आणि समुद्र व त्यामध्ये जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटलेः आणखी उशीर होणार नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 आणि जो युगानुयुगे जिंवत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे, भूमी व तिच्यावर जे आहे आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले, “आणखी वेळ लागणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 आणि जे युगानुयुग जिवंत आहे, ज्यांनी आकाश व त्यातील सर्वकाही, पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही, समुद्र व त्यातील सर्व जलचर निर्माण केले, त्यांची शपथ वाहून म्हटले, “आता अधिक विलंब लागणार नाही!

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 10:6
14 Iomraidhean Croise  

पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी ह्याच्यासमोर मी बाहू उभारून सांगतो की,


कारण सहा दिवसांत परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला; म्हणून परमेश्वराने शब्बाथ दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला.


आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती त्यात मी तुम्हांला नेईन आणि तो तुम्हांला वतन करून देईन; मी परमेश्वर आहे.”’


त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या दिवशी मी इस्राएलास निवडून घेतले, याकोब वंशाकडे मी हात उचलून शपथ वाहिली, मिसर देशात त्यांना मी प्रकट झालो, हात उचलून त्यांना शपथपूर्वक म्हणालो की, मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून, जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटल्याचे मी ऐकले, “एक समय, दोन समय व अर्धा समय एवढा अवधी आहे; पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”


ज्या देशात तुम्हांला घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली आहे त्यात जाणारच नाही; पण यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र जातील.


मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


म्हणून ‘स्वर्गांनो’ व त्यांत राहणार्‍यांनो, ‘उल्लास करा!’ पृथ्वी व समुद्र ह्यांत राहणार्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.”


सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मोठी ‘वाणी [स्वर्गाच्या] मंदिरातून,’ राजासनापासून निघाली; ती म्हणाली, “झाले!”


तो मला म्हणाला, “झाले! मी अल्फा व ओमेगा, म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी ‘तान्हेल्याला जीवनाच्या’ झर्‍याचे ‘पाणी फुकट’ देईन.


तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील ‘राजासनावर जो बसलेला’ त्याच्या पाया पडतात; जो ‘युगानुयुग जिवंत’ त्याला नमन करतात; आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात,


“हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस; कारण तू सर्वकाही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”


‘राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे’ त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करतात,


तेव्हा त्या प्रत्येकाला एकेक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan