Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आणि त्या समयांच्या मध्यभागी ‘मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ वस्त्र परिधान केलेला,’ आणि छातीवरून ‘सोन्याचा’ ‘पट्टा बांधलेला’ असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा व लांब पायघोळ झगा घातलेला, छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला, असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा, पायघोळ झगा परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्या समयांच्या मध्यभागी मानवपुत्रासारखा दिसणारा कोणी एक उभा होता. त्यांनी पायघोळ वस्त्र घातले होते व छातीवर सोन्याचा पट्टा बांधला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 1:13
15 Iomraidhean Croise  

एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली; ती सोन्याच्या जरीची आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाची केली; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.


नीतिमत्ता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल.


तेव्हा पाहा, मानवपुत्रासारख्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला; तेव्हा मी आपले तोंड उघडून, जो माझ्यासमोर उभा होता त्याला म्हटले, “हे माझ्या स्वामी, ह्या दृष्टांताने क्लेश पावून मी व्याकूळ झालो आहे व माझ्यात काही त्राण राहिले नाही.


तेव्हा मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तर आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला; तो त्या पुराणपुरुषाकडे आला व त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले.


मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला; त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता, त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते; त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते; व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती.


मग त्याने त्याला अंगरखा घातला, कमरेला कमरबंद कसला, झगा घातला, त्याच्यावर एफोद घातले आणि एफोदावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळली.


कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.


नंतर ‘मी पाहिले, तेव्हा’ पांढरा मेघ व त्या ‘मेघावर’ बसलेला ‘मनुष्याच्या पुत्रासारखा’ कोणीएक ‘दृष्टीस पडला;’ त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हातात तीक्ष्ण धारेचा विळा होता.


आणि स्वच्छ व तेजस्वी ‘तागाची वस्त्रे परिधान केलेले’ व छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेले असे, ‘सात पीडा’ घेतलेले ते सात देवदूत त्या मंदिरातून निघाले.


इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही : जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो,


Lean sinn:

Sanasan


Sanasan