Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 92:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 हे परमेश्वरा, पाहा, तुझे वैरी, पाहा, तुझे वैरी नाश पावतील; सर्व दुष्कर्म्यांची दाणादाण होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा; सर्व वाईट करणारे विखरले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 हे याहवेह, तुमच्या सर्व शत्रूंचा, निश्चितच सर्व शत्रूंचा नाश होईल, आणि समस्त दुष्कर्म्यांची दाणादाण होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 92:9
21 Iomraidhean Croise  

दुर्जन तसे नाहीत, ते वार्‍याने उडून जाणार्‍या भुसासारखे आहेत.


तू उठून सीयोनेवर दया करशील; कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे. नेमलेला समय येऊन ठेपला आहे;


तू पुरातन काळी पृथ्वीचा पाया घातलास; गगने तुझ्या हातचे कृत्य आहे.


दुर्जन तर नाश पावतील; परमेश्वराचे वैरी कुरणाच्या क्षणिक शोभेसारखे होतील; ते नाहीसे होतील; ते धुरासारखे नाहीसे होऊन जातील.


त्यांना जिवे मारू नकोस, मारलेस तर माझ्या लोकांना विसर पडेल; हे प्रभू, तू आमची ढाल आहेस; आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर, त्यांना खाली पाड.


लव्हाळ्यामध्ये राहणारे वनपशू, बैलांचा कळप आणि त्यांचे वत्स ह्यांना धमकाव; रुप्याचा लोभ धरणार्‍या लोकांना पायाखाली तुडव. युद्धप्रिय लोकांची त्याने दाणादाण केली आहे.


पाहा, जे तुझ्यापासून दूर जातात ते नष्ट होतात. अनाचार करून बहकून जाणार्‍या सर्वांचा तू समूळ नाश करतोस.


तू राहाबाला1 ठेचून ठार केले आहेस; तू आपल्या बाहुबलाने आपल्या शत्रूंची दाणादाण केली आहेस.


कारण हे परमेश्वरा, तू सर्व पृथ्वीहून अत्युच्च आहेस. सर्व देवांहून तू परमथोर आहेस.


राष्ट्रे महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात; परंतु तो त्या खळबळीस प्रतिरोध करील व ती नाहीशी होईल; डोंगरांवरचे भूस व वावटळीतील धूळ ही वार्‍यापुढे उडून जातात तशी ती नष्ट होईल.


तुझ्या वस्तीचा तिसरा हिस्सा पटकीने मरेल व तुझ्यामध्ये लोक उपासमारीने नाश पावतील; तिसरा हिस्सा तुझ्याभोवती तलवारीने पडेल; व तिसरा हिस्सा मी सर्व दिशांना विखरीन; मी तलवारीने त्यांची पाठ पुरवीन.


परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील.


कोश पुढे जाण्यास निघाला म्हणजे मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, ऊठ, तुझ्या शत्रूंची दाणादाण होवो आणि तुझे द्वेष्टे तुझ्यापुढून पळून जावोत.”


तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा.’


आता ज्या माझ्या वैर्‍यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्यादेखत ठार मारा.”


ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत ‘परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवतील.’


पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत, सर्व राष्ट्रांमध्ये परमेश्वर तुमची पांगापांग करील, आणि तेथे तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना अपरिचित अशा काष्ठपाषाणमय म्हणजे अन्य देवांची सेवा तुम्ही कराल.


हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणार्‍या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan