Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 92:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत, किंवा मूर्खाला ती समजत नाहीत,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मतिमंद लोकांना त्याचे आकलन होत नाही; मूर्खांना हे समजत नाही की,

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 92:6
18 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सुज्ञतेने केलीस; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.


भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.


मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही,” लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही.


निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यांसारखे होऊ नका; त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे, नसली तर ती तुझ्याजवळ येणार नाहीत.


कारण तो पाहतो की, ज्ञानी मरतात, तसेच मूढ व पशुतुल्य नष्ट होतात, आणि आपले धन दुसर्‍यांना ठेवून जातात.


मी तर मूढ व अज्ञानी होतो; तुझ्यापुढे मी पशुवत होतो.


फुशारकी मारणार्‍यांना मी म्हणालो, “फुशारकी मारू नका;” आणि दुर्जनांना म्हणालो, “आपल्या बळाचा तोरा मिरवू नका;


अहो पशुतुल्य लोकहो, लक्ष द्या; मूर्खांनो, तुम्ही कधी शहाणे व्हाल?


“अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हांला कोठवर आवडणार? निंदा करणारे निंदेत कोठवर आनंद पावणार, आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार?


ज्ञान मूर्खाच्या आटोक्याबाहेर असते; वेशीवर तो आपले तोंड उघडीत नाही.


मला मनुष्य म्हणू नये इतका मी मूढ आहे, मनुष्यात समज असतो तो माझ्यात नाही.


बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो; पण इस्राएल ओळखत नाही, माझे लोक विचार करीत नाहीत.”


हेही सेनाधीश परमेश्वराकडून घडते, त्याची बुद्धी आश्‍चर्यकारक व त्याचे चातुर्य थोर आहे.


कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.


प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे; प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे; कारण त्याने ओतलेली मूर्ती साक्षात लबाडी आहे, त्यांच्यात मुळीच प्राण नाही.


तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी असून प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आचरणाप्रमाणे व कर्मफलाप्रमाणे द्यावे म्हणून मानवजातीचे अखिल मार्ग तुझ्या दृष्टीला खुले आहेत;


परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहेस, ते कोणाचे होईल?’


स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan