Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 92:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 नीतिमान लोक खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील, ते लबानोनातील गंधसरूसारखे अभिवृद्ध होतील;

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 92:12
17 Iomraidhean Croise  

त्याने लबानोनावरील देवदारूपासून ते भिंतीतून उगवणार्‍या एजोब झाडापर्यंत सर्व उद्भिज्जांचे विवेचन केले; तसेच पशू, पक्षी, रांगणारे जंतू व मासे ह्यांचेही त्याने विवेचन केले.


त्या मंदिराच्या सर्व भिंतींवर सभोवार आतून व बाहेरून करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरली होती.


इकडे यहूदी लोकांनी आपल्या सर्व शत्रूंवर तलवार चालवून त्यांचा वध व विध्वंस केला; मनास येईल तसा त्यांनी आपल्या विरोध्यांचा समाचार घेतला.


जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.


परमेश्वराचे वृक्ष, लबानोनावर त्याने लावलेले गंधसरू, रसभरित असतात;


पर्वत व सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधसरू,


परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.


मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; देवाच्या दयेवर सदासर्वकाळ माझा भरवसा आहे.


त्याच्या कारकिर्दित नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो.


दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच.


काटेर्‍याच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल; ह्यावरून परमेश्वराचे नाव होईल; ते सर्वकाळचे चिन्ह होईल, ते कधी नष्ट होणार नाही.”


ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील, असे व्हायचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील.


तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदीकिनारी पसरील; उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील; अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही.”


मी तर त्यांच्यापुढून अमोरी लोकांचा संहार केला; त्यांची उंची गंधसरूच्या उंचीसारखी होती. ते अल्लोन झाडांसारखे मजबूत होते; मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासवले.


जी मला म्हणाली होती की, “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” ती माझी वैरीण ते पाहील व ती लज्जेने व्याप्त होईल; माझे डोळे तिला पाहतील, तिला रस्त्यांतल्या चिखलासारखे तुडवतील.


खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदीतीरीच्या बागांसारखे, परमेश्वराने लावलेल्या अगरू वृक्षांसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan