Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 92:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगांप्रमाणे उन्नत केले आहेस, मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस; मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 परंतु तुम्ही माझे शिंग रानबैलासारखे उंच केले आहे; नवीन तेलाने मला अभिषिक्त केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 92:10
19 Iomraidhean Croise  

देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन, म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणार्‍या सर्वांचा उच्छेद होईल.


त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल2


जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्म्यांबरोबर घालवून देईल. इस्राएलास शांती असो.


तेथे दावीदवंशाची प्रतिष्ठा वाढेल1 असे मी करीन; मी आपल्या अभिषिक्तासाठी दीप मांडला आहे.


आणि त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कर्ष केला आहे;2 तो आपल्या सर्व भक्तांना, त्याच्याजवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्राएलाच्या संततीला स्तुतिपात्र आहे. परमेशाचे स्तवन करा!1


तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या धमकीने, तुझ्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने जलाशयाचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले.


तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस; तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस; माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.


तुला नीतिमत्त्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.


दुर्जनांचा ध्वज मी खाली ओढीन,1 पण नीतिमानाचा ध्वज फडकत राहील.2


कारण त्यांच्या बलाचे वैभव तू आहेस; तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील.2


माझी सत्यता व माझी दया त्याच्यासोबत राहतील; माझ्या नावाने त्याचा उत्कर्ष होईल3


देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले; जणू काय रानबैलांचे बळ त्यांच्या ठायी आहे.


देवाने त्याला मिसर देशातून बाहेर आणले आहे; त्याचे बळ रानबैलाच्या बळासारखे आहे; तो आपल्या शत्रुराष्ट्रांना ग्रासून टाकील, त्यांच्या हाडांचा चुराडा करील, आपल्या बाणांनी त्यांना छेदून टाकील.


आणि आपल्यासाठी त्याने आपला दास ‘दावीद’ ह्याच्या घराण्यात ‘बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे;


जो आम्हांला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठायी सुस्थिर करत आहे तो देव आहे;


जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे.


हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणार्‍या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.


हन्ना हिने प्रार्थना केली ती ही : “परमेश्वराच्या ठायी माझे हृदय उल्लासत आहे; परमेश्वराच्या ठायी माझा उत्कर्ष झाला आहे; माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे. कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे.


परमेश्वराशी झगडणार्‍यांचा चुराडा होईल. तो त्यांच्यावर आकाशातून गर्जेल; परमेश्वर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्याय करील; तो आपल्या राजाला बल देईल, तो आपल्या अभिषिक्ताचा उत्कर्ष करील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan