Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तोच जगाचा यथार्थ न्याय करील; तो लोकांना खरा न्याय देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार, राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 ते नीतिमत्तेने जगावर राज्य करतात आणि समानतेने लोकांना रास्त न्याय देतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 9:8
15 Iomraidhean Croise  

ह्या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. ज्यामुळे नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?”


परमेश्वर युगानुयुग राजा आहे; त्याच्या देशातून राष्ट्रे नष्ट झाली आहेत.


परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो; परमेश्वर राजासनावर सर्वकाळ बसलेला आहे.


आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते; देव स्वतः न्याय करणारा आहे. (सेला)


न्याय नीतिमानाकडे वळेल आणि सरळ मनाचे सर्व जन तो अनुसरतील.


कारण तो आला आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे; तो न्यायीपणाने जगाचा व सत्यतेने लोकांचा न्याय करील.


कारण तो पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे; तो जगाचा न्याय यथार्थतेने करील, व लोकांचा न्याय सरळपणे करील.


राजाचे सामर्थ्य न्यायप्रिय आहे; तू सरळता प्रस्थापित केली आहेस; तू याकोबात न्याय व नीती अंमलात आणली आहेस.


परमेश्वर युगानुयुग राज्य करील.”


तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे.”


ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan